जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता पालकमंत्र्यांची टीका

ठाणे : समूह विकास योजनेच्या कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ‘निवडणुकांच्या तोंडावर क्लस्टरचे गाजर असे होर्डिग्ज लावून टीका करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देऊ आणि जेव्हा इमारत पूर्ण होईल तेव्हा नारळ फोडायला बोलावू,’ अशा शब्दात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. महापौर नरेश म्हस्के यांनीही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचा नामोल्लेख टाळत राष्ट्रवादीवर शाब्दिक हल्ला चढविला. क्लस्टरच्या निमित्ताने या दोन पक्षांत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?

ठाण्यातील लोकमान्य नगर येथील कोरस रस्त्यालगतच्या सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत पुनर्वसन इमारत उभारण्यात येणार असून या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळय़ा कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवसेनेने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात शिवसेनेच्या आक्रमणाचा रोख भाजपपेक्षा राष्ट्रवादीकडे अधिक असल्याचे पाहायला मिळाले. मध्यंतरी राष्ट्रवादीकडून निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा क्लस्टरचे गाजर अशा स्वरूपाचे फलक मुख्यालय परिसरात लावण्यात आले होते. या फलकांचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. ‘‘ज्या भागात शिवसेनेचे नगरसेवक, आमदार नाही तेथेही आम्ही निधी दिला. विकासात कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी परखडपणे उत्तर देईन,’ असा इशारा त्यांनी दिला. ठाणे शहरातील समूह विकास योजनेत दिवा भागाचा समावेश करण्याची सूचना शिंदे यांनी या वेळी पालिका प्रशासनाला केली. 

अंमलबजावणीसाठी वेगाने हालचाली

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी समूह विकास योजनेच्या कामाबाबत माहिती दिली. पालिकेने ४५ पूनर्निर्माण आराखडे तयार केले असून त्यातील सहा आराखडय़ांना मंजुरी मिळाल्याचे शर्मा म्हणाले. ‘या योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतीत तीनशे चौरस फुटांच्या एकूण २४३ सदनिका असणार आहेत. ही इमारत लवकरच बांधून त्यात किसननगर भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येईल,’ असेही ते म्हणाले.

महापौरांचे टीकास्त्र

क्लस्टर योजनेचे गाजर असे फलक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर लावले होते. त्याचा समाचार महापौर म्हस्के यांनी घेतला. समाजात लायकी नाही, सोसायटीचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असे लोक बॅनर लावून टीका करतात. त्यांच्या आम्ही टीकेला भीक घालत नाही, अशी टीका त्यांनी भाषणात केली. शिंदे यांना आपला मतदारसंघ सोडून निवडून येईल अशा सोयीच्या मतदारसंघात निवडणूक लढावी लागली नाही, असा टोलाही म्हस्के यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला.