scorecardresearch

कल्याणमधील सह्याद्री राॅकच्या गिर्यारोहकांकडून त्र्यंबकेश्वरच्या अवघड स्काॅटिश कड्यावर गिर्यारहोण

स्काॅटिश कडा त्र्यंबकेश्वर जवळील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत आहे

कल्याणच्या सह्याद्री राॅक ॲडव्हेन्चर गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी रविवारी, महाराष्ट्र दिनी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील भीमकाय कडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५५० फूट अवघड स्काॅटिश कड्यावर यशस्वी गिर्यारोहण केले. महाराष्ट्र दिनाचे आौचित्य साधून महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये हौतत्म्य पत्करणाऱ्या १०५ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

ग्रीहिता विचारे ही लहान मुलगी या मोहिमेत सहभागी झाली होती. शरीर भाजून काढणारे उन, अंगाची लाहीलाही होत असताना गिर्यारोहकांनी ही अवघड कामगिरी केल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. शिवकालीन मावळ्यांचा पेहराव करून गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. स्काॅटिश कडा त्र्यंबकेश्वर जवळील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत आहे. या डोंगर रांगामधील हा सर्वाधिक अवघड, उंच सुळका आहे. या कड्यावर जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथून दोन मार्ग आहेत. एक निरगुड पाडा येथून तर दुसरा हर्षवाडीच्या पायथ्यापासून या कड्यावर जाण्यासाठी मार्ग आहे.

रविवारी सकाळी दोन तासाचा अवघड चढ चढत गिर्यारोहक स्काॅटिश कड्याच्या पायथ्याशी पोहचले. मग सुरू झाले कड्यावर जाण्याचे आरोहण. खांद्यावर भगवे झेंडे, मावळ्यांचा वेश परिधान केलेले गिर्यारोहक सावधपणे आवेशात सुळक्यावर चढू लागले. सुळक्यावर चढण्यासाठी सहा भागात कड्याची गिर्यारोहकांनी विभागणी केली आहे. सह्याद्री राॅकचे स्वयंसेवक गिर्यारोहकांना सुळक्यावर जाण्यासाठी जागोजागी मदत करत होते. दोरखंड, बचावाची सामुग्री घेऊन गिर्यारोहक अवघड पाषण, गोलई दगड पार करत होते. एक तासात गिर्यारोहकांनी हा अवघड सुळका पार केला. या मोहिमेत सह्याद्री राॅकचे पवन घुगे, दर्शन देखमुख, रणजित भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, नीतेश पाटील, सुनील खनसे, कल्पेश बनोटे, प्रशील अंबाडे सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Climbers of sahyadri rak in kalyan climbed the difficult scottish ridge of trimbakeshwar hrc