कल्याणफाटा येथे सुमारे एक हजार किलो गोमांसाने भरलेला टेम्पो शिळ डायघर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक आणि एका बोगस पोलिसाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेतल आहेत.

हेही वाचा >>>ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच

seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी
Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

शिळ डायघर पोलिसांचे एक पथक बुधवारी सकाळी कल्याणफाटा परिसरात गस्ती घालत होते. त्यावेळेस एक टेम्पोमधून उग्र वास पथकाला येत होता. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहाणी केली असता, त्यात मोठ्याप्रमाणात मांस आढळून आले. पोलिसांनी टेम्पो चालकाला विचारले असता, त्याने ते गोमांस असल्याची कबूली दिली. तसेच हे गोमांस मुंबईतील अंधेरी येथे नेत असल्याचेही सांगितले. चालकाच्या शेजारी एक व्यक्ती बसला होता. त्यावेळेस चालकाने हा पोलीस असून कारवाई टाळण्यासाठी दोन लाख रुपये मागत असल्याचे सांगितले. पथकाने त्याच्याकडे पोलीस ओळखपत्र मागितले असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलिसांनी त्याला पकडले.

हेही वाचा >>>ठाणे विभागीय अंतिम फेरी जल्लोषात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी त्याच्या इतर साथिदारांची माहिती विचारली असता ते मागून येणाऱ्या गाडीत बसले असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक त्यांच्या दिशेने जात असताना त्यांना गाडी सोडून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालक आणि बोगस पोलिसाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता चालकाने त्याचे नाव इस्तिगीर कुरेशी असल्याचे नाव सांगितले. तर बोगस पोलिसाचे नाव राॅकी वैद्य असल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांविरोधात शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.