लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथः अंबरनाथ शहराची चिखलोली भागात विस्थापीत केलेली कचराभूमी शेजारच्या नागरिकांना डोकेदुखी ठरत असतानाच आता या कचराभूमीतून निघणारे सांडपाणी कल्याण बदलापूर राज्यमार्गाशेजारी राहणाऱ्या रहिवाशी आणि प्रवाशांना डोकेदुखी ठरते आहे. कचराभूमीतून येणारे दुर्गंधीयुक्त काळे सांडपाणी बदलापूरच्या मार्गिकेवर साचत असल्याने प्रवाशांची वाट बिकट झाली आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून या पाण्याच्या संपर्कात येण्याने आजारपण येण्याची भीती व्यक्त होते आहे. भूमिगत सांडपाणी वाहिन्यांतून हे सांडपाणी थेट बाहेर येत असल्याने भूमिगत गटारींच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

Waghbeel, waste water on road,
वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा, रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गेल्या काही वर्षात कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला होता. यापूर्वीची कचराभूमी फॉरेस्ट नाका ते टी जंक्शनदरम्यानच्या जागेवरून चिखलोली येथे आरक्षित भुखंडावर स्थलांतरीत करण्यात आला. गेल्या वर्षी या कचराभूमीतून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त काळेशार सांडपाण्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या पाण्याच्या टाक्या दूषीत, आसपासची शेतजमिनी नापिक झाल्या. त्यामुळे या सांडपाण्याच्या नियोजनाची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने कचराभूमीतून निघणारे हे सांडपाणी भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांना जोडण्यात आले.

हेही वाचा… मृत सफाई कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या; उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेला आदेश

मात्र पहिल्याच मोठ्या पावसात या भुयारी गटारीतून थेट पाणी रस्त्यांवर आले. मात्र या पावसाळी पाण्यासोबत कचराभूमीतून निघणारे काळेशार, दुर्गंधीयुक्त सांडपाणीही थेट रस्त्यांवर आले. गेल्या दोन दिवसांपासून हे सांडपाणी कल्याण बदलापूर राज्यमार्गावर चिखलोलीच्या प्रवेशद्वारापासून थेट बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत एका संपूर्ण मार्गिकेवर पसरते आहे. या सांडपाण्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे या मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे सागते आहे. या मार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने, नामांकीत हॉटेल, आस्थापने आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांवरही याचा परिणाम होतो आहे.

हेही वाचा… कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्याची दुर्दशा, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

सोबतच या मार्गावरून बदलापुरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या दुर्गंधी आणि पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून मार्ग काढताना पाण्याच्या संपर्कात येण्याने आजारपण गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो आहे. तासनतास हे सांडपाणी रस्त्यावर साचून राहते आहे. त्यामुळे या सांडपाण्याचे वेळीच व्यवस्थापन करण्याची मागणी होते आहे.

रस्त्याच्या कडेला नालेच नाहीत

कल्याण बदलापूर राज्यमार्गावर अंबरनाथ ते बदलापूर या मार्गिकेवर फॉरेस्ट नाक्यापुढे कोणतीही नाल्याची व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. एमएमआरडीएने रस्ता तयार करताना जागेचा अभाव हे कारण दिले. त्याचा प्रवाशी आणि आसपासच्या रहिवाशांना गेल्या पाच वर्षांपासून त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाठवण्यात आले होते. आता सांडपाणी साचणार नाही याची काळजी घेऊ. – डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.