वाहनचोरी, सोन्याचे दागिने, पैसे चोरणारे चोर अनेक असतील, पण वसईतील चोरांच्या एका टोळीने तर चक्क विद्युत ट्रान्सफॉर्मरच (रोहित्र) चोरून नेले आहे. आगाशीतील खांडान वाडी येथे महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगत या चोरांनी गावकऱ्यांच्या डोळय़ादेखत ट्रान्सफॉर्मरची चोरी केली. चोरांच्या या टोळीविरोधात महावितरण कंपनीने सागरी पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद नोंदवली आहे.

आगाशी येथे उंबरगोठण-नवापूर रस्त्यावरील खांडान वाडी वळणावर असलेला जुना ट्रान्सफॉर्मर बदलून तिथे नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याचे दाखवून विद्युत खांबापाशी काही जण आले. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत त्यांनी ट्रान्सफॉर्मर बदलण्याचा आव आणला. त्यासाठी त्यांनी आधी विद्युतपुरवठा बंद केला. हा किमती ट्रान्सफॉर्मर काढून त्यांनी रिकामी पेटी बंद करून तेथून पोबारा केला आणि गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत ट्रान्सफॉर्मरची चोरी केली. संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता आणि नवीन ट्रान्सफॉर्मरही आला नव्हता. त्यामुळे काही गावकऱ्यांनी वीज मंडळाच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला. मात्र ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविले नसल्याचे त्यांनी सांगितले.

खांडान वाडी हा विभाग वीज मंडळाच्या अर्नाळा क्षेत्रात येत असून त्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आगाशी सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. दिवसाढवळ्या खांबावरून ट्रान्सफॉर्मरची चोरी झाल्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

प्रतिनिधी, वसई