बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

१० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

माजी नगरसेवकाला अटक

दिघ्यामधील राष्ट्रवादी काँग्रसचा माजी नगरसेवक राम यादव याला बलात्कार प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी यादव याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी फार्मविण्यात आली आहे.

दिघ्याचा दबंग नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम यादवविरोधात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. रबाळे पोलीस स्थानकामध्ये या महिलेने रितसर तक्रार नोंदवल्यानंत यादवला अटक करण्यात आली. रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी याबाबत प्राथमिक चौकशी करून सदर तक्रार दाखल करून त्वरित कारवाई करीत यादव याला अटक केले.  यादव याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे अशी माहिती गीते यांनी दिली आहे.

याबाबत यादव आणि त्याचे स्वीय सहाययक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. तरी आता १० एप्रिलला न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex corporator of ncp held for rape case

ताज्या बातम्या