भिवंडी जवळील एका गोदामात पुणे कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने टाकलेल्या छाप्यात पावणे दोन कोटी रुपये किंमतीचा खत आणि किटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे तंत्र अधिकारी किरण जाधव यांना भिवंडी जवळील एका गोदामात खते आणि कीटकनाशकांचा बेकायदा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. जाधव यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पथकाने गोदाम परिसरात सापळा लावला. या पथकाने भिवंडीतील एका वेअर हाऊसवर छापा टाकला. अरविंद पटेल यांच्या नावे असलेल्या गोदामात खत, कीटकनाशक ठेवण्यात आली होती. या साठ्या संदर्भात कारवाई पथकाने पटेल यांच्याकडे कागदपत्रे मागितली. खत साठवणुकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळले. साठा बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत कारवाई पथकाने तो जप्त केला.

Delhi Bomb Threat
दिल्लीतील १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी; केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू
NHSRCL Implements Solar Power Projects , Solar Power Projects, Bullet Train Depots, Solar Power Projects for Bullet Train Depots, National High Speed Rail Corporation Limited, Focuses on Sustainable Practices, bullet train thane depot, bullet train sabaramati depot, marathi news,
बुलेट ट्रेनच्या डेपोमध्ये सौरऊर्जेचा वापर करणार; ठाणे, साबरमतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?

कीटकनाशके, विद्राव्य खते, अन्नद्रव्य असा एकूण एक कोटी ७५ लाख रुपये किमतीचा साठा जाधव यांच्या पथकाने जप्त केला आहे. भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.