मीरा रोडमधल्या इंद्रलोक परिसरातील झोपडय़ांना आग, सिलेंडरचा स्फोट

मीरा रोड येथे इमारत बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या झोपडय़ांना आग लागून त्यात एका ३६ वर्षीय अपंग महिलेचा मृत्यू झाला. या वेळी लागलेल्या आगीत झोपडय़ांमध्ये असणाऱ्या चार गॅस सिलेंडरचेदेखील स्फोट झाले. झोपडय़ांच्या आसपास आणखी चार लहान मुले खेळत होती मात्र आग लागल्याचे दिसताच ही मुले तेथून पळण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
may month personality know may month born people traits nature career and personality
मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास गुण! आयुष्यात कमावतात भरपूर पैसा-प्रतिष्ठा
tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले

मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरातल्या बाळासाहेब ठाकरे मैदानाशेजारी असलेल्या रिकाम्या जागेत विकासकाने मजुरांसाठी झोपडय़ा बांधल्या होत्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झोपडय़ांना अचानक आग लागली. झोपडय़ांमधून राहणारे मजूर कामावर निघून गेल्याने या वेळी झोपडय़ांमध्ये ३६ वर्षीय अपंग कृष्णा दास आणि तीन-चार मुलेच होती. आग लागताच मुले झोपडय़ांबाहेर पडण्यात यशस्वी ठरली. दुर्दैवाने अपंग कृष्णा मात्र झोपडी बाहेर पडू शकल्या नाहीत आणि आगीत त्यांचा करुण अंत झाला. या वेळी आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु बांबू आणि प्लास्टिकच्या साहाय्याने बांधलेल्या झोपडय़ा जळून खाक झाल्या. या वेळी झोपडय़ांमध्ये असलेल्या चार गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले. आगीची तीव्रता एवढी होती की आगीच्या धगीमुळे लगतच्या इमारतीचे सांडपाण्याचे पाइपदेखील वेडेवाकडे झाले.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. आग लागली त्याला लगतच वीज कंपनीचे उपकेंद्र आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट होऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता होती.

पित्याशी शेवटचा संपर्क होऊ शकला नाही

घटनेत मृत्यू झालेला कृष्णा दास याला अपंग असल्याने स्वत:हून चालणे शक्य नव्हते. आग लागल्याचे दिसताच जिवाच्या आकांताने त्याने ओरडायला सुरुवात केली परंतु त्याचा उपयोग होत नसल्याचे पाहून स्वत:च्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या पित्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अखेपर्यंत तो झालाच नाही. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कृष्णा यांची आपल्या पित्याशी अखेरची बातचीतदेखील होऊ न शकल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.