पुणे : मुळशी येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा “धनशक्ती”चा वापर होत असल्याचा आरोप केला होता. आता बारामती सहकारी बॅंकेतून ५०० रूपयांचा नोटा गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे  लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असताना आता हा नवा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार बारामती सहकारी बॅंकेतून ५०० रूपयांच्या नोटा गायब झाल्याची माहिती आहे. त्या नोटा खातेदारांना मिळत नाहीत. आता या नोटा कुठे गेल्या. याचे रहस्य काही उलगडत नाही. हा निव्वळ योगायोग आहे की पाच दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीचा सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल्ल शोचा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील असे म्हणत पुणे जिल्हा बॅंकेबाबतही असेच बघावे लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

sena ubt leader kirtikar moves bombay hc seeks to declare waikar s victory void
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तीकरांचे आव्हान
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
MLA Sameer Kunawar reacts on allegation about 140 acres of land for medical college
१४० एकर जमिनीवर आमदार समीर कुणावार यांचा डोळा, तर कुणावार म्हणतात…
Sanjay Raut on Ambadas Danve
“भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने…”, विधानपरिषदेतल्या राड्यानंतर संजय राऊतांकडून अंबादास दानवेंची पाठराखण
sant tukaram maharaj abhang in fm ajit pawar s budget speech
‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले.. अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणात संत तुकाराम महाराज यांचे अभंग
Supriya sule and jitendra awhad
“भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या लाडक्या बहिणीला…”, ‘लाडकी बहिणी योजने’वरून आव्हाडांची अजित पवारांवर टीका
Four of Hinduja family sentenced to imprisonment Alleged harassment of domestic servants
हिंदुजा कुटुंबातील चौघांना कारावासाची शिक्षा; गृहसेवकांचा छळ केल्याचा आरोप

हेही वाचा : वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे

दरम्यान, याआधी देखील रोहित पवारांनी एक व्हिडीओ एक्सवर टाकत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या सभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे दिल्याचा आरोप केला होता. तसेच व्हिडीओ असलेल्या महिलांनी देखील दिलेले पैसे बाहेर काढून दाखवले होते.