ठाण्यातील ज्येष्ठ वकील प्रशांत कायंदे यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरटय़ांनी सुमारे चार लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
 कोलबाड येथील प्रताप टॉवरमध्ये अ‍ॅड. प्रशांत कायंदे (६२) राहत असून, त्यांचे उथळसर परिसरात कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी कायंदे दाम्पत्य कार्यालयात गेले होते, तर त्यांची दोन्ही मुले सकाळी कामावर गेली होती. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी त्यांच्या घरात डल्ला मारला.