महिला शिवसैनिकांचा लॉजमध्ये घुसण्याचा निर्धार
वसईमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजमध्ये घुसून तो बंद पाडण्याचा निर्धार शिवसैनिक महिलांनी केला आहे.
वसई-विरार शहरात जागोजागी लॉज उभे राहिले आहे. राहण्याची उत्तम सोय, अतिथिगृह अशा गोंडस नावाखाली चालणाऱ्या लॉजमधून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असतो. या लॉजमध्ये केवळ वेश्या व्यवसाय सुरू असल्याने त्यांचे परवाने नूतनीकरण करू नका, असे पत्र शिवसेनेने वसई प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्याची दखल न घेतली गेल्याने लॉजमध्ये घुसून आंदोलन करण्याचा निर्धार शिवसैनिक महिलांनी केला आहे. याबाबत माहिती देताना शिवसेना नेते विनायक निकम यांनी सांगितले की, ‘यापूर्वीही आम्ही लॉजमधला वेश्याव्यवसाय बंद पाडला होता. मात्र तो पुन्हा सुरू झाला आहे. वेश्या व्यवसायामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ धोक्यात येऊन शहराची बदनामी होत आहे. लॉजमालकांकडून कुठल्याच नियमांचे पालन होत नाही, त्यामुळे त्यांचे परवाने रद्द करून हे लॉज बंद करावे, अशी मागणी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पुढच्या आठवडय़ात कुठल्याही क्षणी लॉजमध्ये घुसून ते बंद पाडले जाईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

निवासी संकुलात खासगी वेश्या व्यवसाय
वसईमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत असून त्यातील घरांमध्ये छुपा देहव्यापार सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. महाविद्यालयीन तरुणी, गृहिणी यांचा त्यात सहभाग असून तो राजरोसपणे सुरू आहे. शहराच्या नैतिकतेच्या दृष्टीने ते हितकारक नसल्याने त्यावरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
वसईतील लॉज, हॉटेलमध्ये वेळोवेळी तपासणी करत असतो. अचानक भेटी देत असतो. छुप्या पद्धतीने देहव्यापार सुरू असेल तर त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करत असतो. एखाद्या लॉज किंवा हॉटेलमालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्याचा परवाना रद्द केला जाईल. – प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे