इंडियन सनबीम हे लायकेनिडे कुळातील म्हणजे ज्यांना ब्लू फुलपाखरे म्हणून ओळखले जाते, त्या कुळामधील साधारण मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. जवळपास संपूर्ण भारतभर आणि त्याचबरोबर शेजारील श्रीलंका, ब्रह्मदेश आणि त्यापुढील प्रदेशातही हे फुलपाखरू सापडते.
tv05या फुलपाखरांमध्ये नर आणि मादी फुलपाखरांचे रंग निरनिराळे असतात. नरांच्या पंखांची वरची बाजू ही अगदी तांबूस म्हणजे लख्ख घासलेल्या तांब्याच्या भांडय़ांसारखी असते तर मादी फुलपाखरांच्या पंखांची वरची बाजू गडद तपकिरी रंगाची असते आणि त्यावर मध्यभागी मोठे पांढरे धब्बे असतात.नर आणि मादी दोन्हींच्या पंखांची खालची बाजू चकचकीत पांढऱ्या रंगाची असते. त्यावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे अगदी बारीक ठिपके असतात.या फुलपाखराची मादी गुंज, गरुडवेल, करंज यांसारख्या झाडांवर अंडी घालते. बाहेर येणाऱ्या सुरवंटाचा रंग पानाच्या रंगाशी इतका मिळताजुळता असतो की सुरवंट वेगळा ओळखताच येत नाही. या फुलपाखरांच्या कोषामधून अतिशय बारीक आवाज येत असतो हा आवाज कसा काय येतो याविषयी अजून संशोधन होणे आहे.
हे फुलपाखरू फुलावर बसून पंखांची उघडझाप करते, तेव्हा त्याच्या चमकदार पांढऱ्या पंखांमधून अचानक तांबडा रंग डोकावतो हे बघताना ढगामधून हलकेच बाहेर येणाऱ्या सूर्यकिरणांचीच आठवण येते. त्यामुळे त्याचे नांव इंडियन सनबीम असे पडले आहे.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
gold silver price
Gold-Silver Price on 5 April 2024: सोन्याच्या किमतीत विक्रमी उडी; चांदीही ८० हजारांच्या पार, जाणून घ्या आजचा भाव