कार्यक्रमात प्लास्टिक पुष्पगुच्छांचा वापर

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतील मालमत्ता विभागाच्या उपायुक्त आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या फ आणि ग प्रभागाच्या विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांना पालिकेच्या एका कार्यक्रमात प्लास्टिक गुंडाळलेले पुष्पगुच्छ वापरल्याने कार्यक्रमातच घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

RBL Bank Fraud Case, 11 Including Senior Officers Booked, Rs 12 Crore Scam, rbl bank scam, rbl bank scam Rs 12 Crore , Senior Officers in RBL Bank scam, Mumbai news,
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

कल्याण, डोंबिवली शहरे कचरा आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे मागील दोन वर्षांपासून आक्रमक उपक्रम राबविले जात आहेत. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापारी, नागरिकांना दंड ठोठावला जात आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पालिकेत सुरक्षा विभागाने सोमवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सुरक्षा विभागाच्या उपायुक्त भागवत प्रमुख आहेत. या कार्यक्रमात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह सर्व उपस्थितांना उपायुक्त भागवत यांनी स्वागत करताना प्रतिबंधित प्लास्टिक गुंडाळलेले पुष्पगुच्छ दिले. ही बाब घनकचरा उपायुक्त कोकरे यांना खटकली. त्यांनी कार्यक्रमातच उपस्थितांसमोर प्लास्टिकचा वापर कार्यक्रमात केला म्हणून आपण उपायुक्त भागवत यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावत असल्याचे जाहीर केले. या घोषणेने संयोजकांसह उपस्थित हादरले. भागवत यांनीही झाल्या चुकीबद्दल दंड मान्य केला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.