भल्याभल्यांचेही भांडवली बाजारातील अंदाज चुकतात. महागाईसमोर आकर्षक परताव्याचा दरही किमान ठरतो. आणि अनेकदा कर कटकटही वाटते. अशा वेळी यशस्वी व्हायचे असेल तर स्वत: अभ्यास करा. गुंतवणूकीचे सोने, रिअल इस्टेट, इक्विटी म्युच्युअल फंड असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ते दीर्घकालीन पर्याय स्वीकारा. गुंतवणुकीचे पारंपरिक धोपट मार्ग सोडा, असा बहुमोलाचा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ञांनी mu11शुक्रवारी ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्यात दिला.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘नातू परांजपे-ईशान ड्रीम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ सहप्रायोजक असलेल्या व ‘एनकेजीएसबी’चे सहकार्य लाभलेल्या ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’चा प्रकाशन सोहळा शुक्रवारी ठाण्यातील ‘टिप-टॉप प्लाझा’ येथे आयोजित करण्यात आला होता. ‘सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी, एनकेजीएसबीचे पी. जी. कामत, ‘टिप-टॉप प्लाझा’चे रोहितभाई शाह, कोटक म्युच्युअल फंडच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (रोखे) लक्ष्मी अय्यर, करसल्लागार जयंत गोखले, गुंतवणूकतज्ज्ञ अजय वाळिंबे व ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते हा ‘अर्थब्रह्म’रूपी ‘गुंतवणूकीचा माहितीमार्ग’ वाचकांसाठी खुला करण्यात आला. गुंतवणुकीचे मूलमंत्र जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांच्या तुडुंब आणि उत्स्फूर्त गर्दीत पार पडलेल्या या सोहळ्यात अजय वाळिंबे, जयंत गोखले आणि लक्ष्मी अय्यर या अर्थतज्ञांनी उपस्थितांना यशस्वी गुंतवणूकदार कसे व्हावे, याचा प्रभावी मूलमंत्र दिला.
mu12‘गुंतवणुकीचा माहितीमार्ग’ खुला..
गुंतवणूक आणि कर सवलतविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे शुक्रवारी ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी (डावीकडून) सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, कोटक म्युच्युअल फंडाच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लक्ष्मी अय्यर, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा, एनकेजीएसबी बँंकेचे पी. जी कामत, गुंतवणूक सल्लागार अजय वाळिंबे, कर सल्लागार जयंत गोखले.    (छायाचित्र : दीपक जोशी)

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर