ठाण्यात बसच्या धडकेने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

एसटी बसच्या धडकेत दुर्वेश गिरी या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

येथील कॅसल मिल भागात मंगळवारी सकाळी भरधाव एसटी बसच्या धडकेत दुर्वेश गिरी या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. धडकेत त्याच्यासोबत असलेली त्याची आजी अनिता गिरी या जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. तसेच या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी बसचालक ज्ञानेश्वर संघशेट्टी याला अटक केली आहे.

ठाण्यातील आझादनगर भागात दुर्वेश गिरी हा राहात होता. तसेच श्रीरंग विद्यालयामध्ये तो तिसरीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी सकाळी तो शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्या वेळी त्याच्यासोबत त्याची आजी अनिता गिरी या होत्या. कॅसल मिल परिसरात रस्ता ओलांडत असताना राज्य परिवहन सेवेच्या वाडा-ठाणे या बसने दोघांना धडक दिली. त्यामध्ये दुर्वेशचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता गिरी या जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

Nine years of child death in bus accident

bus accident, child death

ठाण्यात बसच्या धडकेने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ठाणे :  येथील कॅसल मिल भागात मंगळवारी सकाळी भरधाव एसटी बसच्या धडकेत दुर्वेश गिरी या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. धडकेत त्याच्यासोबत असलेली त्याची आजी अनिता गिरी या जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. तसेच या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी बसचालक ज्ञानेश्वर संघशेट्टी याला अटक केली आहे.

ठाण्यातील आझादनगर भागात दुर्वेश गिरी हा राहात होता. तसेच श्रीरंग विद्यालयामध्ये तो तिसरीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी सकाळी तो शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्या वेळी त्याच्यासोबत त्याची आजी अनिता गिरी या होत्या. कॅसल मिल परिसरात रस्ता ओलांडत असताना राज्य परिवहन सेवेच्या वाडा-ठाणे या बसने दोघांना धडक दिली. त्यामध्ये दुर्वेशचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता गिरी या जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nine years of child death in bus accident