डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांवर कारवाई

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून कारवाई सुरू केली.

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवल्याने हा रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे आणि वाहनचालकांना वाहन चालवणे सुलभ झाले आहे.

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाला हटाव पथकातील १५ कामगार रेल्वे स्थानक परिसरातील गुप्ते रस्ता, दीनदयाळ, महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता, विष्णुनगर परिसर फेरीवालामुक्त करतात. मग डोंबिवली पूर्व भागातील ग, फ प्रभागातील ३० कामगारांना ३०० फेरीवाल्यांना हटविण्यात कोणते अडथळे येतात, असे प्रश्न पादचारी करत होते. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये ‘डोंबिवलीला फेरीवाल्यांचा वेढा’ या शीर्षकाखाली शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ग प्रभागाचे पथक प्रमुख रमाकांत जोशी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डॉ. रॉथ रस्ता, पाटकर रस्ता, रामनगर, राजाजी रस्ता भागात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटविण्याबरोबर त्यांचे सामान जप्त केले जात होते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर पूर्व भागात फेरीवाल्यांचे अडथळे सहन करत रिक्षा वाहनतळापर्यंत जावे लागते. सकाळ, सायंकाळ नोकरदार, पादचाऱ्यांना होणारा हा त्रास होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. फेरीवाल्यांवर दिखाव्यापुरती कारवाई करू नये.

लता अरगडे, उपाध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Peddlers dombivli railway station ysh

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या