शाळांच्या बेकायदा सुट्टीची तक्रार करणाऱ्या सरपंचांचा आरोप

पालघरमधील चार शाळांच्या बेकायदा सुटी प्रकरणाला नाटय़मय वळण मिळाले आहे. या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या सरपंचाने आपल्यावर दबाव टाकून आणि दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या सरपंचाला अशा प्रकारे धमकावल्याचे पडसाद तालुक्यात उमटले आहेत. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Chinese President Xi Jinping met former Taiwan leader Ma Yin jeou
चीन आणि तैवानच्या नेत्यांची भेट
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

गेल्या सोमवारी १३ मार्च रोजी धुळवडीच्या निमित्ताने सार्वजनिक सुटी होती. रविवारी होळी आणि सोमवारी धुळवडीच्या सलग दोन सुटय़ा शाळांना मिळालेल्या होत्या. परंतु मंगळवारी १४ मार्च रोजी पालघर तालुक्यातील चार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी सुटी घेतली होती. याबाबतची तक्रार खामलोली येथील शिवसेनेचे सरपंच दिनेश डगला यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती. ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीनंतर शाळांना सुटी दिल्याचा दावा या शाळातील शिक्षकांनी केला होता. त्या वेळी सरपंच दिनेश डगला यांनी गैरसमजुतीने ही तक्रार दिल्याचा लेखी माफीनामा सादर केला होता. परंतु आता हा माफीनामा शिक्षक आणि काही ग्रामस्थांनी दबाव टाकून लिहून घेतला असल्याचा धक्कादायक आरोप सरपंच दिनेश डागला यांनी केला आहे. या शाळांनी कुठलीच परवानगी घेतली नव्हती, तसेच मागील तारीख टाकून बनावट परवागनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मला बोलावण्यात आले. तेथे शिक्षक आणि १५ ते २० जणांनी मला घेरले आणि मला दमदाटी केली आणि माझा माफीनामा लिहून घेतला, असा आरोप डगला यांनी केला आहे. या शाळांच्या शिक्षकांनी कुठलीच परवानगी घेतली नव्हती आणि जी परवानगी घेतल्याचा दावा केला जात आहे ती परवानगी मागील तारीख टाकून बनावट तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तसेच शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघरचे गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा विषय मिटलेला आहे. सरपंच डागला यांना कुणीही धमकी दिलेली नाही. त्यांचे आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. शाळांनी रीतसर परवानगी घेतली होती.

दोनच ऐच्छिक सुटय़ा घेण्याचा आधिकार

जिल्हा परिषद शाळांना वर्षांतून दोन ऐच्छिक सुटय़ा घेण्याचे अधिकार आहे. शाळा व्यवस्थापन समितीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. शाळा व्यवस्थापन समितीत १७ सदस्य असतात. त्यात पालक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असतो. शनिवार आणि सलग दोन सुटय़ा असल्याने धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी सुटी घेऊ  नये, असे स्पष्ट आदेश विस्तार अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिले होते, असे काही शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे मंगळवार १४ मार्च रोजी पालघरमधील सर्व शाळा सुरू होत्या. पूर, नैसर्गिक आपत्ती किंवा अपवादात्मक परिस्थितीच, अशी ऐच्छिक सुटी घेता येते अशीही माहिती या शिक्षकांनी दिली.