ठाणे : सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे रक्ताचे नाते आहे. सुप्रिया सुळे यांना राजकीय फायदा घ्यायचाच असता तर, त्यांनी सुप्रिया पवार-सुळे असे नाव लावले असते, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच लोकसभा निवडणुका या कर्तत्वावर लढविल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक आवाहन केले होते की आता पवार आडनाव पाहून मतदान करा. इतके दिवस तुम्ही शरद पवारांना मत दिले, सुप्रियाला मत दिले, मला निवडून दिले. आता सुनेला निवडून द्या. त्यावर अजित पवार योग्यच बोलले. पण त्यात एक मूळ पवार आणि दुसरा बाहेरुन आलेला पवार अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. यावरून अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे झाली तरीही सून बाहेरची कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा…डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे रक्ताचे नाते आहे. सुप्रिया सुळे यांना राजकीय फायदा घ्यायचाच असता तर, त्यांनी सुप्रिया पवार-सुळे असे नाव लावले असते. लोकसभा निवडणुका या कर्तृत्वावर लढविल्या जातात. तुम्हाला बोलता किती येते. तुमचा विषयांचा आवाका किती आहे आणि तुम्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती किती आहे आणि त्यावर तुमची बुद्धी कशी चालते यावर हे सगळे असते. यात आडनावाचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत, असे म्हणावे लागत असल्याचे सांगत आव्हाड यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. आजही पटेल यांना शरद पवार यांचे नाव घेऊन चर्चेत राहावे लागत असल्याचेही ते म्हणाले. विकासाच्या मुद्यावर भाजपला निवडणुका लढवायच्याच नाहीत. हिंदु, मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नाही. बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरीष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा…निलेश सांबरे लढविणार भिवंडीत अपक्ष निवडणूक, वंचितकडून उमेदवारी नव्हे तर केवळ पाठींबा असल्याचे सांबरे यांनी केले स्पष्ट

मराठी माणसाला आता कुठेच स्थानच नाही. ज्या दिवशी मराठी माणसाने स्वत:ला ५० खोक्यांना विकले. त्या दिवशी दिल्लीश्वरांना कळले की, हे पैशांसाठी हापहापले आहे. त्यांना पैसे टाका आणि विकत घ्या, अशी टिकाही त्यांनी केली. बेशीस्तपणाने भाजपवाले वागत असून निवडणुक विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवडणुक विभाग हे भाजपवाल्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी, त्यातून रुसवे फुगवे होत असतात. परंतु वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असेही ते म्हणाले.