Premium

ठाण्यात विहीरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत चितळसर पोलीस तपास करत आहेत.

body of man was found Nalpada area ​​Kapurbavadi thane
ठाण्यात विहीरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

ठाणे: कापूरबावडी येथील नळपाडा भागात अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बुधवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत चितळसर पोलीस तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नळपाडा येथील भगवान चाळ परिसरात विहीर आहे. बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास या विहीरीत एक मृतदेह स्थानिकांना आढळून आला. घटनेची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून मृताची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The body of man was found in the nalpada area of kapurbavadi in thane dvr

First published on: 29-11-2023 at 12:05 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा