Premium

भाईंदर : मीरा रोडमध्ये परिवहन बस चालकाला मारहाण

वाहन योग्य पद्धतीने चालवत नसल्याचे आरोप करत दुचाकीस्वार नागरिकांनी महापालिकेच्या परिवहन बस चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Transport bus driver beaten
भाईंदर : मीरा रोडमध्ये परिवहन बस चालकाला मारहाण (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

भाईंदर : वाहन योग्य पद्धतीने चालवत नसल्याचे आरोप करत दुचाकीस्वार नागरिकांनी महापालिकेच्या परिवहन बस चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन बस गाडी ही भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाहून बोरीवलीच्या दिशेने प्रवास करत होती. यावेळी मीरा रोडच्या एस.के.स्टोन परिसरात येताच या गाडीपुढे दोन दुचाकीस्वार येऊन थांबले आणि त्यांनी वाहन चालकाला शिवीगाळ करून काचेवर आदळ-आपट करण्यास सुरुवात केली. यानंतर बसमध्ये प्रवेश करून बस चालकाला मारहाण केली. यावेळी हेल्मेटचा घाव बसल्याने बस चालकाचे बोट मोडले.

हेही वाचा – ठाणे : वागळे इस्टेट परिसराची जलचिंता मिटणार, एमआयडीसीच्या जागेत दोन जलकुंभाची उभारणी

हेही वाचा – डोंबिवली : कॉम्रेड विजयानंद हडकर यांचे निधन

ही संपूर्ण घटना बसमधील प्रवाशांनी आणि वाहकाने मोबाईलमध्ये कैद केली. यात बस चालकाने चुकीच्या पद्धतीने गाडी फिरवल्यामुळे जीव धोक्यात आला असल्याचे आरोप दुचाकीस्वारकडून करण्यात येत होते. तर कोणतीही चूक नसताना मारहाण करण्यात आल्यामुळे बस चालक देविदास इंगोले यांनी मीरा रोड पोलीस ठाणे गाठले असून तक्रार दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transport bus driver beaten in mira road ssb

First published on: 30-11-2023 at 19:44 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा