येथील उपवन तलावात पोहण्यासाठी उतरलेले दोघेजण पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
वागळे इस्टेट भागातील किनीनगर परिसरात रहाणारे लोकेश नाईक (२४) आणि योगेश जगताप (२४) आणि त्यांचे मित्र रविवारी सायंकाळी उपवन तलावात पोहण्यासाठी उतरले. पण, पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघे बुडाले. या घटनेनंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.