शहराच्या पूर्व विभागातील सारस्वत कॉलनीतील गुरु मंदिर रोडलगत उभ्या असलेल्या एका दुचाकी व चारचाकी गाडीला शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. विजयश्री सोसायटीमध्ये रहाणारे मनीष विसपुते यांची चारचाकी गाडी आहे. त्यांनी आपली गाडी रात्री गुरुमंदिर रस्त्यालगत उभी केली होती. सकाळी पावणे सहाच्या सुमारास गाडीला आग लागली. विसपुते यांच्याकडे दुध टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीने त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता त्यांच्या गाडीसह बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी गाडीलाही आगीने वेढले असल्याचे दिसले. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.

तसेच या घटनेपासून काही अंतरावर असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील एका गोदामालाही याचदरम्यान आग लागली होती. गोदामात लाकडी बांबू ठेवले असल्याने लाकडाने पेट घेतल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. नागरिकांनी याविषयी पोलीस व अग्निशमन दलाशी संपर्क साधला.  अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

Take concrete steps to house remaining mill workers demand of mill workers on Labor Day
मुंबई : उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, कामगार दिनी गिरणी कामगारांची मागणी
Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!