गिर्यारोहण विश्वात ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे नाव सर्वत्रच आदराने घेतले जाते. ‘गिर्यारोहण’ त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि अशा व्यक्तिविकासातून समाजविकास, या सूत्राने गेली अनेक वर्षे ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेत संस्थेने गेल्या दोन वर्षांत सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ आणि त्यापाठोपाठ ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’, मकालू अशा तीन मोहिमांमध्ये अभूतपूर्व असे यश मिळवले. चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमुख केले. गिर्यारोहणातून समाजविकासाचे हे ध्येय ठेवून संस्थेतर्फे लहान मुलांसाठी सुरूकेलेला ‘आव्हान’ उपक्रम यंदा नव्या पर्वात प्रवेश करत आहे. यंदा या उपक्रमाचे आयोजन ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअरिंग’ तर्फे करण्यात आले आहे. सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावरील गिर्यारोहण आणि त्याला अनुसरून अन्य छंदांचा या उपक्रमामध्ये समावेश आहे. या उपक्रमामध्ये १० ते १८ वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. ‘आव्हान’ आणि ‘निर्माण’ नावाने असलेला हा अभ्यासक्रम वर्षभरासाठी असून त्यामध्ये बाह्य़ आणि वर्गातर्गत शिक्षण दिले जाणार आहे. डोंगरयात्रा, भटकंती, प्रस्तरारोहण, सह्याद्रीचा इतिहास, गिर्यारोहणातील तांत्रिक प्रशिक्षण, पर्यावरण अभ्यास, छायचित्रण आदी विषय या उपक्रमाअंतर्गत शिकवले जाणार आहेत. गिर्यारोहणातून जोपासली जाणारी संघभावना, नेतृत्व, समयसुचकता, आशावाद, संयम आदी कौशल्ये या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येणार आहेत. एव्हरेस्ट मोहिमेचा यशाचा झेंडा रोवणारी ‘गिरिप्रेमी’ ही या क्षेत्रातली जुनी, अनुभवी संस्था आहे. मार्गदर्शक, तज्ज्ञ मंडळी, आवश्यक साधनसामग्री आणि ग्रंथालय ही संस्थेची जमेची बाजू आहे. आजवरच्या संस्थेच्या या अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्याच्या हेतूनेच या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून यासाठी विवेक शिवदे (९७६९३०२९३४) किंवा चंदन चव्हाण (९४२२०१५४०३) यांच्याशी संपर्क साधावा.

Sangli, fake news, social media,
सांगली : फेक न्यूज समाजमाध्यमात प्रसारित केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Dignitaries in Kolhapur, kolhapur lok sabha seat, Dignitaries in Kolhapur Urge for Democratic Vigilance, Democratic Vigilance, Dignitaries in Kolhapur appeal win shahu maharaj, shahu maharaj, Hatkanangale lok sabha seat,
कोल्हापुरातील समाज धुरीण एकवटले; फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय नैतिकता गमावल्याची चिंता
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’