पुण्या-मुंबईपासून जवळ एक दिवसाच्या ट्रेकसाठी रायगड जिल्ह्य़ातील अवचितगड हा एक चांगला पर्याय. निसर्गाची हिरवाई आणि इतिहास या दोन्हींनी हा गड भटक्यांना सुखावून टाकतो.

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे रस्ता रोहा या तालुक्याच्या ठिकाणी येतो. कुंडलिका नदीच्या काठाने वसलेला हा तालुका कोकणातल्या इतर तालुक्यांसारखाच आजूबाजूला डोंगर आणि भरपूर जंगल असलेला. जवळच कळसगिरी डोंगररांगा आहेत. या डोंगरांवर दुरूनच काय जवळ गेल्यावरसुद्धा एखादा किल्ला असेल असे वाटत नाही. जंगलाने पूर्ण आच्छादलेले डोंगर. मात्र इथे एक चांगला गिरिदुर्ग आहे. त्याचं नाव अवचितगड. स्थानिकांकडून नावाची दोन कारण ऐकायला मिळतात. एक असे, की तो अतिशय घाईत बांधला गेला असावा किंवा दुसरे डोंगर चढताना कोणतीही शक्यता वाटत नसताना अचानक सामोरा येतो म्हणून.
‘इंटरनेट’वर शोधाशोध केली तेव्हा गडाला ३ रस्ते असल्याचं लक्षात आलं. पेंडसे, मेडे आणि पिंगळसई अशा आजूबाजूच्या तीन गावांतून यावर चढायचे हे ते मार्ग. ही गावं तशी गडाच्या घेऱ्यात वसलेली. आम्ही निवडला पिंगळसईचा मार्ग. रोह्य़ातून कुंडलिंकेवरचा पूल ओलांडून गेल्यावर पिंगळसई येतं. गावात चौकशी केल्यावर कळलेल्या मार्गानी अंदाजानेच निघालो. गाव संपल्या संपल्या लगेच जंगल चालू होतं. जसजसं वरती जाऊ तसं ते अधिकच दाट होत जातं. पायाखाली पाऊलवाट असली तरीही अंदाजानेच वरती जाणं उत्तम. कारण आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना जंगलातल्या वाटांचा माग लागणं जरा अवघडच.
अवचितगडाच्या वाटेवर जसं वर जाऊ तसं मागची अन् पुढची वाट काही फुटांपर्यंत दिसते. झाडांच्या दाटीमुळे खालचं गाव आणि वरचा किल्ला दोन्ही दृष्टिपथात येत नाहीत. पुढे गेल्यावर या वाटेला मेढे गावातून येणारी वाट येऊन मिळते. तसं पाहिलं तर ही वाट जवळपास किल्ल्याच्या पूर्व तटबंदीखालून जाते पण जंगलामुळे ते लक्षात येत नाही. पुढे एका बुरुजाच्या बाजूने पडक्या दरवाजाकडे वाट जाते. इथून पुढे गेलो, की किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो.
अवचितगडावर दोन छोटय़ा टेकडय़ा आहेत. त्यांच्या बाजूने पायवाटेने सारा किल्ला हिंडता येतो. आत शिरल्यावर उजवीकडे उत्तरेकडच्या बुरुजाकडे वाट जाते. इथे काही चौथरे आणि एक तोफ नजरेस पडतात. पिंगळसईच्या दिशेनी तटबंदीमध्ये एक चोरदरवाजासुद्धा आहे. पण मातीने, दगडांनी आता हा दरवाजा बंद झाला आहे. महादरवाजासमोर उंचवटय़ावर एक टेहळणी बुरूज आहे. दोन्ही टेकाडांच्या मध्ये सदर आणि हौदासारखी रचना आढळून येते.
पश्चिमेच्या तटबंदीला लागून असलेल्या पायवाटेने गेल्यास दक्षिणकडे टाक्यांचा एक समूह नजरेस पडतो. सात टाक्यांचा हा समूह सदैव पाण्याने भरलेला दिसतो. त्या आतून जोडलेल्या असल्याचे स्थानिकांकडून समजले. या टाक्यांच्या थोडे वरती चढून गेल्यास तिथे देवी आणि शंकराचे मंदिर आहे. समोर पाण्याचा तलावसुद्धा आहे.
असेच पुढे दक्षिणेला गेल्यास एक बुरूज दरवाजा आणि पेंडसे गावातून येणारा रस्ता दिसतो. दरवाजाजवळ एक शिलालेख देखील कोरलेला आहे. या बाजूनी पुन्हा पिंगळसई गावात उतरण्यासाठी रस्ता आहे. इथे एक सुंदर दृश्य बघायला मिळतं. अवचितगडाचा डोंगर आणि शेजारचा डोंगर यामध्ये एक निसर्गनिर्मित खाच आहे. साधारण २०-२५ फुटांची ही खाच दोन्ही डोंगरांना विलग करते. इथे गावक ऱ्यांनी एक साकव बांधलेला आहे. झाडांचे दोन लांब बुंधे आणि त्यावर आडव्या ठोकलेल्या फळ्या असा साधारण दहा-पंधरा फुटाचा हा साकव दुरून तर सुंदर दिसतोच पण त्यावरून दोन्ही बाजूला एकीकडे पिंगळसई आणि दुसरीकडे मेढे अशी गावं आणि त्यांच्या सभोवतालचा परिसर असं दृश्य अतिशय मनोहर वाटतं. या परिसरात क्वचित प्रसंगी मोरसुद्धा आढळतात.
कधीतरी एकदा या अवचितगड पाहायला, किल्लेपण अजून शाबूत आहे याचं. कोणत्याही ऋतूमध्ये कुठल्याही वाटेनं या तुम्ही निराश निश्चितच होणार नाहीत!

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय