डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, वकिलांचा वकिल किंवा शिक्षकाचा शिक्षक अशी रीत काही वर्षांपूर्वी होती. मागील काही काळात ती मागे पडली होती. मात्र एक कुटुंब असे आहे ज्यामध्ये एका कुटुंबातील ३ पिढ्या पायलट असून मागील १०० वर्षांपासून त्यांच्यातील पाचजण आपले काम अतिशय आनंदाने करत आहेत. यात अग्रेसर असणारे मुलांचे आजोबा आता हयात नसून पुढील दोन पिढ्या या क्षेत्रातील आपले स्थान टिकवून आहेत. विमानातून उड्डाण करण्यावर त्यांचे विशेष प्रेम असून भसीन कुटुंबातील आई-वडिल, त्यांची दोन मुले आणि आजोबा या सगळ्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.

कॅप्टन जय देव भसीन हे १९५४ मध्ये पायलट झाले. देशातील पहिल्या ७ पायलटपैकी ते एक होते इतकेच नाही तर ते कमांडरही होते. निवेदीता जैन या भसीन काम करत असलेल्या इंडियन एअरलाईन्स या कंपनीत रुजू झाल्या. त्यानंतर काही वर्षांनी त्या भसीन कुटुंबाच्या सून झाल्या. पायलट म्हणून काम करणाऱ्या जैन या त्यावेळी देशातील तिसऱ्या महिला होत्या. त्या आणि त्यांचे पती रोहीत भसीन यांच्यासाठी पालक म्हणून अतिशय अभिमानाची बाब आहे की रोहन आणि निहारीका ही त्यांची मुले आज याच क्षेत्रात आपले करिअर करत असल्याचे ‘एनडीटीव्ही इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

House burglary, Khandeshwar,
खांदेश्वरमध्ये दीड लाखांची घरफोडी
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक

निवेदीता सांगतात, मला १९८४ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाईन्सचे नोकरी मिळाल्याचे पत्र आले मी केवळ २० वर्षांची होते. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते आणि माझे वडिल त्याठिकाणी माझे नोकरीचे पत्र घेऊन धावत आले. त्या सांगतात, वयाच्या २६ व्या वर्षी मी बोईंग ७३७ विमानाची जगातील सर्वात कमी वयाची महिला कॅप्टन होते. तर वयाच्या ३३ व्या वर्षी एअरबस ३०० ची कमांडर होते.

रोहन भसीन हाही आता तरुण वैमानिक ७७७ बोईंगचा कमांडर आहे. त्याला एअर इंडियामधील १० वर्षांचा अनुभव आहे. तर २६ वर्षांची त्यांची मुलगी निहारीका इंडिगोमध्ये पायलट आहे. रोहन याने आपल्या वडिलांबरोबर जवळपास दहा वेळा एकत्रित विमान उडविले आहे. आईवडिल म्हणून इतर पालकांप्रमाणेच आम्हाला त्यांची काळजी असते आणि एकाच क्षेत्रात काम करत असल्याने आम्ही त्यांना सारख्या लहान-मोठ्या सूचना देत असतो असे निवेदीता म्हणाल्या.