24 November 2020

News Flash

Viral Video : दोनदा कारनं धडक दिल्यावरही ‘ती’ आश्चर्यकारकरित्या बचावली

हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

एवढा भयंकर अपघात होऊनही ही महिला आश्चर्यकारकरित्या बचावली.

‘दैव तारी त्याला कोण मारी’ याचा परिचय नुकताच व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून आला. दोनदा कारनं धडक दिल्यानंतरही एक महिला अपघातातून सुखरूप बचावली, विशेष म्हणजे तिला फक्त किरकोळ जखमा झाला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ CGTN ने आपल्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केला आहे.

चीनमधल्या एका रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. ही महिला वर्दळीच्या रस्त्यावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण, समोरून येणाऱ्या गाडीची धडक तिला बसली आणि ती गाडीखाली आली. चालकानं आणि रस्त्यावरच्या इतर लोकांनी तत्परतेनं या महिलेला गाडीखालून बाहेर काढलं. ही महिला गाडीखालून बाहेर येते न येते तोच गाडीत असणाऱ्या लहान मुलानं चुकून गाडी सुरु केली. त्यामुळे या महिलेच्या अक्षरश: अंगावरून पुन्हा एकदा गाडी गेली. पण, एवढा भयंकर अपघात होऊनही ही महिला आश्चर्यकारकरित्या बचावली. तिला काही किरकोळ जखमा झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 10:44 am

Web Title: a video footage shows the moment when a woman was run over by a car twice
Next Stories
1 आज विकीपीडियाचा वाढदिवस: विकीपीडियाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहितीये का?
2 Video : असा जेलीफिश तुम्ही कधीच पाहिला नसेल
3 VIDEO : ही हृदयस्पर्शी प्रेमकथा तुम्हालाही नवी उमेद देईल
Just Now!
X