19 April 2019

News Flash

Viral Video : आफ्रिकन गायकाचं ‘झिंगाट…’ गाणं ऐकून तुम्हीही ‘सैराट’ व्हाल!

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

सॅम्यूअल हनी सिंगचा जबरा फॅन आहे

अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडलं. ‘सैराट’ प्रदर्शित होऊन वर्ष उलटलं तरी रसिकांवरील ‘झिंगाट…’ची ‘झिंग’ काही कमी झालेली नाही. अगदी या गाण्याची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली. या ‘झिंगाट…’ गाण्यानं एका आफ्रिकन गायकाला एवढं वेड लावलं की त्याने स्वत:च्या स्टाईलमध्ये ‘झिंगाट…’ गाणं गायलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुकही केलंय.

Viral Video : ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्यावरील तरूणीचा धम्माल डान्स पाहा!

सॅम्युअल सिंग असं या गायकाचं नाव आहे. आता सॅम्यूअलचं आडनाव वाचून तो ‘सिंग’ कसा? असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल, तर हनी सिंगचा जबरा फॅन असलेल्या सॅम्यूअलने आपलं अॅडिपोजू आडनाव बदलून सिंग असं आडनाव धारण केलं. जयपूरमधील एका कॉलेजमध्ये शिकत असताना तो तोडकी मोडकी हिंदी शिकला.  काही महिन्यांपूर्वी सॅम्युअलनं पवन कुमारनं गायलेलं ‘लॉलीपॉप लागेलू’ हे गाणं गायलं होतं. त्याने आपल्या फेसबुक पेजवर हे गाणं शेअर केल्यानंतर काही क्षणात या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

First Published on September 19, 2017 11:48 am

Web Title: african singer samuel singh honestly try to sing zingat song