महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ट्विटरवर नेहमी मजेशीर ट्विट्स आणि व्हिडिओ ते शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा महिंद्रांनी एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. महिंद्रांनी एका बैलगाडीचा व्हिडिओ शेअर करुन त्याची तुलना थेट दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या गाड्यांसोबत केलीये.

(खुलासा! एलन मस्क Apple ला स्वस्तात विकणार होते Tesla, पण टिम कुक यांनी बैठकीसाठीच दिला नकार)

आनंद महिंद्रांनी बैलगाडीचा हा व्हिडिओ शेअर करताना टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनाही टॅग केलं आहे. व्हिडिओसोबत त्यांनी, “मला नाही वाटत की, टेस्लाच्या गाड्याही या कमी खर्चाच्या रिन्युएबल एनर्जी-फ्युअल कारसोबत स्पर्धा करु शकतील”, असं मजेशीर ट्विट केलं आहे. महिंद्रांनी शेअर केलेल्या ५० सेकंदाच्या व्हिडिओच्या सुरूवातीला दोन बैल दिसतात, पण काही क्षणातच ही साधीसुधी बैलगाडी नसल्याचं लक्षात येतं. कारण गाडीला बैल जरी जुंपलेले असले तरी मागच्या बाजूला चक्क ambassador कारचा मागचा भाग जोडलेला दिसतो. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. महिंद्रांनी व्हिडिओद्वारे मस्क यांना चांगली आयडिया सुचवली, असं अनेकांचं म्हणणं आहे. तर, हे फक्त भारतातच होऊ शकतं अशा प्रतिक्रियाही अनेक नेटकरी देत आहेत. बघा व्हिडिओ –


दरम्यान, बैलगाडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

(खुलासा! एलन मस्क Apple ला स्वस्तात विकणार होते Tesla, पण टिम कुक यांनी बैठकीसाठीच दिला नकार)