28 February 2021

News Flash

प्रसूतीपूर्वी गर्भवतीने लावला ठुमका, इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे

सामन्यत: प्रसूतीवेळी गर्भवती महिलांना अतिशय त्रासदायक प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. मात्र, प्रसूतीपूर्वी एक गर्भवती महिला  ठुमका लावत नृत्य करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या विदेशातील नसून पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. गर्भवती महिला व तिच्या महिला डॉक्टराच्या नृत्याची नेटकºयांनी चांगलीच प्रशंसा केली आहे.

सोशल माध्यम ट्विटरवर हर्ष गोयंका नामक व्यक्तीने गर्भवती महिलेचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. सी-सेक्शन प्रसूतीच्या काही मिनिंटापूर्वी, डॉक्टर व रुग्णाचे जबरदस्त नृत्य. हे लुधियानामध्ये झाले आहे, असे ट्विट गोयंका यांनी केले आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर स्वत: गर्भवती महिलेने या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. डॉक्टरच्या व्यवहारावर शंका व्यक्त करण्याची गरज नाही, असे संगीता शर्मा नामक या गर्भवती महिलनेने म्हटले आहे. त्याचबरोबर आपण नृत्यदिग्दर्शक असून गर्भधारणेच्या इतर काळात देखील आपण नृत्य केल्याचे त्या म्हणाल्या. सोशल माध्यमावरील त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. Just a few minutes before the C-section delivery, the Doctor and the patient perform a nice jig. This happened in Ludhiana. pic.twitter.com/ZOlzIhbQ8c

— Harsh Goenka (@hvgoenka) December 28, 2018

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 7:17 pm

Web Title: doctor and the patient perform a nice jig
Next Stories
1 व्हिडीओत माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करताना दिसली महिला, 3 वर्षांची शिक्षा
2 Video : सोहळ्यादरम्यानच्या आतिशबाजीनं ‘मिस आफ्रिके’च्या केसांना स्टेजवर लागली आग
3 ‘मस्तानी हो गई’ गाण्यावर थिरकल्या अमृता फडणवीस, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X