कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो असं जे म्हणतात ते खरंच आहे. इमानी कुत्र्याने त्याच्या मालकाला मदत केल्याच्या, कठीण परिस्थितीत त्याला सोडवायच्या आणि त्याचा जीव वाचवल्याच्या अनेक कथा आपण एेकतो. अशा वेळी त्याला स्वत:चा जीवही गमवावा लागतो पण त्याही परिस्थितीत तो आपल्या मालकासाठी सगळं पणाला लावतो.
मुंबईत सायनमध्येही अशीच घचना समोर आली आहे. एका २३ वर्षांच्या तरूणाच्या चाकूहल्ल्यापासून दोघा महिलांना वाचवल्याचं समोर आलंय.

सायनमध्ये राहणाऱ्या वेंकटेश नावाच्या एका तरूणाचं त्याच्या वहिनीशी कडाक्याने भांडण झालं. या भांडणादरम्यान त्याने चाकू घेत त्याची वहिनी रोझीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी घरातून बाहेर जात रोझीने तिची शेजारीण सुनिताच्या घरी आश्रय घेतला. पण रागाने आंधळा झालेला वेंकटेश सुनिताच्या घरातही शिरला. सुनिताने रोझिीला वाचवण्याचा प्रयत्न करताच वेंकटेशने तिलाही ठार मारण्याची धमकी दिली. आणि तो तिच्यावर चालीन आला

अशा या कठीण प्रसंगी सुनिताच्या कुत्र्याने वेंकटेशवर झेप घेतत त्याला नखं मारत त्याला चावत तिला या दोघींपासून दूर खेचत नेण्याचा प्रयत्न केला. य़ा सगळ्या झटापटीत वेंकटेशच्या हातातला चाकू सुनीताच्या कुत्र्याच्या पोटात खुपसला गेला. आणि रक्तस्त्रावाने या कुत्र्याचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत त्याने रोझी आणि सुनिताचे प्राण वाचवले होते. कारण एवढा वेळ चाललेल्या आरडाओरडीमुळे बाकीचे लोक जमा होऊन त्यांनी वेंकटेशच्या मुसक्या आवळल्या.

माणसांप्रमाणेच कुत्र्यांना भावभावना कळतात. आपली मालकीण संकटात सापडली आहे हे न सांगताही सुनिताच्या कुत्र्याला हे कळलं आणि त्याने खुनशी वेंकटेशवर हल्ला चढवला आणखी स्वत:च्या जिवाची किंमत देत रोझी आणि सुनीता या दोघींचे प्राण वाचवले.