News Flash

१ जानेवारीला जन्मलेल्या मुलीला मिळणार ५ लाख

महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींना धनलाभ

१ जानेवारीला जन्मलेल्या मुलीला मिळणार ५ लाख
नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे

बेटी ही धनाची पेटी असते, म्हणूनच १ जानेवारीला बंगळुरूमधल्या महापालिका रुग्णालयात जन्म घेणाऱ्या मुलींना ५ लाख रुपये मिळणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे पाच लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती महापौर आर. संपत राज यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 3:57 pm

Web Title: girl baby will get five lakh who born on 1st january
Next Stories
1 जगातल्या सर्वात सुखी प्राण्यासोबत रमला टेनिसचा बादशाहा फेडरर
2 हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद
3 धीरुबाईंनी मुकेश अंबानींना दिले होते ‘हे’ खास मंत्र
Just Now!
X