सौर उर्जा हा उर्जेचा अक्षय उर्जास्त्रोत आहे. पण असे असले तरी तिचा वापर मात्र कुठेही पुरेपुर केला जात नाही. फारसे पैसे खर्च न करता या उर्जेचा वापर करून पुरेपुरे विद्युत निर्मिती करणे शक्य आहे पण याबाबत आपण सारेच उदासिन आहोत. सौर उर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण करावी यासाठी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी ही मोहिम हाती घेतली भारताच्या ९ राज्यांतून त्याने सायकलने प्रवास करत शाळा, गावे, महाविद्यालय शक्य असेल तिथे जाऊन हा विषय लोकांपर्यंत पोहचवला. यासाठी त्याने तब्बल ७ हजार ४२४ किलोमीटर प्रवास केला.

वाचा : फ्रान्सने बनवला जगातील पहिला सोलार महामार्ग

आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थी सुशील रेड्डी आणि त्याच्या तीन मित्रांनी सौर उर्जेच्या वापराबाबात जनजागृती करण्यासाठी ९ राज्य पालथी घातली. मुंबईपासून त्याने आपल्या प्रवासाला सुरूवात केली. सोलार पॅनल बसवलेली आपली सायकल घेऊन त्यांनी अनेक राज्यांत भेटी दिल्या. तिथल्या शाळात, कॉलेज, विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी आणि गावक-यांशी संवाद साधला. त्यांना उर्जेचे महत्त्व पटवून दिले. सुशील रेड्डी याचे तीन मित्र राजेंद्र भास्कर, क्रृणल टेलर आणि हिमांशू सिंग यांनी देखील या मोहिमेत त्याला साथ दिली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांना त्याने भेटी दिल्या. हा संपूर्ण प्रवास त्याने ७९ दिवसांत पूर्ण केला. त्यामुळे गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

वाचा : ५०० रुपयांच्या जुन्या नोटेपासून विद्यार्थ्याने केली विद्युत निर्मिती