News Flash

मगरीची हत्या करुन झाडाला लटकवलं, नंतर कापून मांसही खाल्लं

ओडिशामधील धक्कादायक प्रकार...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

ओडिशाच्या एका गावातून हैराण करणारी घटना समोर आली आहे. मलकानगिरी जिल्ह्यातील कलडापल्ली गावात लोकांनी एका मगरीला पकडून मारुन टाकलं, इतकंच नाही तर त्या मगरीचं मांस देखील खाल्लं. या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि वन विभागात खळबळ उडाली असून वन विभागाचे अधिकारी मगरीला मारुन टाकणाऱ्या आणि खाणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे.

कलडापल्ली गावाच्या पोडिया ब्लॉकजवळ एक साबेरी नदी आहे. बुधवारी काही गावकऱ्यांना या नदीमध्ये मगर दिसली, त्यांनी त्या मगरीला पकडून तिची हत्या केली व दोरी बांधून तिला झाडाला लटकवलं. त्यानंतर काही जणांनी धारधार शस्त्राने मगरीचे तुकडे करुन मांस खाल्लं. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत.


दरम्यान, “आम्हाला या घटनेची माहिती मिळताच, काही अधिकारी गावात गेले. पण तिथे आम्हाला काही मिळालं नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मगरीची हत्या करुन खाणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल”, अशी माहिती वन अधिकारी प्रदीप मिरसे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 10:51 am

Web Title: in odisha some villagers killed and ate crocodile probe underway sas 89
Next Stories
1 Viral Video: मुंबईतील महिला डॉक्टर PPE कीटमध्येच ‘हाय गर्मी’वर थिरकली; वरुण धवनही कमेंट करुन म्हणाला…
2 सरकार प्रत्येक भारतीयाला देणार दोन हजार रुपये?; वाचा व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘त्या’ व्हायरल मेसेजमागचं सत्य
3 मोदी सरकारने बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅपना गुगलचाही दणका, घेतला हा निर्णय
Just Now!
X