06 March 2021

News Flash

लॉकडाउनमध्ये भारतीयांनी सर्वाधिक ‘मिस’ केली पाणीपुरी, पण ‘हा’ लज्जतदार पदार्थ ठरला एक नंबर!

अव्वल ठरलेल्या 'त्या' लज्जतदार पदार्थाची प्रत्येक सेकंदाला एकापेक्षा जास्त ऑर्डर...

(संग्रहित छायाचित्र)

करोना संकटकाळामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये लोकांना बाहेरच्या पदार्थांचा आनंद घेता आला नाही, पण ‘चिकन बिर्याणी’च्या चाहत्यांची संख्या मात्र काही कमी झाली नाही.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीने पाचव्यांदा वार्षिक आकडेवारी जारी केलीये. स्विगीच्या रिपोर्टनुसार, २०२० मध्ये बिर्याणीबाबत भारतीयांचं प्रेम कमी झालं नाही. प्रत्येक सेकंदाला एकापेक्षा जास्त बिर्याणीची ऑर्डर करण्यात आली आणि ” चिकन बिर्याणी” भारतीयांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणून कायम राहिला. शिवाय तीन लाख नव्या युजर्सनी स्विगीवर पहिल्यांदाच चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली.

मसाला डोसा दुसऱ्या क्रमांकावर :-
या रिपोर्टनुसार व्हेज बिर्याणीला लोकांची तेवढी पसंती मिळाली नाही. प्रत्येक एका व्हेज बिर्याणीच्या ऑर्डरमागे सहा चिकन बिर्याणीच्या ऑर्डर यायच्या. चिकन बिर्याणीनंतर मसाला डोसाने दुसरा क्रमांक पटकावला. मसाला डोसाच्या खालोखाल पनीर बटर मसाला, चिकन फ्राइड राइस आणि गार्लिक ब्रेडस्टिक्ट्सच्याही बऱ्याच ऑर्डर झाल्या.

सुस्ती घालवण्यासाठी चहा-कॉफीचा सहारा :-
रिपोर्टनुसार, दुपारच्या जेवणानंतर सुस्ती दूर करण्यासाठी स्विगीच्या ग्राहकांनी निरनिराळ्या चहा आणि कॉफीची ऑर्डर केली. यामुळे लॉकडाउनमध्ये कॅपेचिनो, फ्लेवर्ड चहा आणि स्ट्रीट फूडच्या मागणीत वाढ झाली.

भारतीयांनी ‘मिस’ केली पाणीपुरी :-
स्विगीच्या सर्व्हेनुसार २०२० मध्ये भारतीयांना सर्वाधिक कमतरता जाणवली तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी. लॉकडाउननंतर पाणीपुरीच्या दोन लाखांपेक्षा जास्त ऑर्डर आल्या, असं स्विगीने म्हटलंय. भोपाळ आणि बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या ग्राहकांनी ऑर्डर पोहोचवणाऱ्याला पाच –पाच हजार रुपये टिप दिल्याचंही स्विगीने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2020 2:28 pm

Web Title: indias favourite dish is chicken biryani on swiggy in 2020 ordered per second while indians missed panipuri gol gappe most sas 89
टॅग : Flashback 2020
Next Stories
1 सैनिकहो तुमच्यासाठी! भारतीय लष्कराच्या विनंतीनंतर ‘राजधानी’ सुसाट धावली, ओलांडली वेगमर्यादा!
2 पोरानं नशीब काढलं! …म्हणून Domino’s पुढील ६० वर्षांपर्यंत देणार फ्री पिझ्झा
3 शेतकरी आंदोलन : नाद खुळा… ६२ वर्षांच्या आजीबाई २३० किमी गाडी चालवत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या
Just Now!
X