29 November 2020

News Flash

IPL 2020 : ‘तो’ फोटो पाहून विराटला झाली शाळेची आठवण, चहल-राशिद खानचेही भन्नाट रिप्लाय

RCB तेराव्या हंगामात आश्वासक कामगिरी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात बहारदार कामगिरी करत आहे. बुधवार KKR चा ८ गडी राखून धुव्वा उडवत RCB ने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. युजवेंद्र चहल-वॉशिंग्टन सुंदरची फिरकी जोडी, पडीकल-फिंच-डिव्हीलियर्सचं फॉर्मात असणं, विराटचं कुशल नेतृत्व या सर्व गोष्टी यंदा RCB ला फायदेशीर ठरताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने RCB चा संघ मैदानावर धडाकेबाज कामगिरी करतोय त्याचप्रमाणे हॉटेलवर आणि सोशल मीडियावरही त्यांची मस्ती सुरु असते.

कर्णधार विराट कोहलीने ट्रेनिंग सेशनमधला, एबी डिव्हीलियर्स, पडीकल, सिराज सोबत उभा असतानाचा एक फोटो पोस्ट केला. यावर विराटने…हा फोटो पाहून शाळेत असतानाची आठवण झाली. ज्यावेळी डिव्हीलियर्ससारखा मुलगा अभ्यास करुन आलेला असतो आणि इतर तिघांना आपण संकटात सापडलोय याची जाणीव झालेली असते हे कळलेलं असतं अशी कॅप्शन दिलेली आहे.

विराट कोहलीच्या या फोटोवर RCB च्या संघातील त्याचा सहकारी चहल, पडीकल आणि SRH चा राशिद खान यांनीही सहभाग घेत भन्नाट रिप्लाय दिला.

गेल्या काही हंगामांमध्ये RCB ची कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. हा संघ नेहमी गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असायचा. परंतू यंदा अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हा संघ प्ले-ऑफच्या दिशेने घौडदौड करतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 8:09 pm

Web Title: ipl 2020 virat kohli chahal and rashid engage in hilarious banter over rcb captains school days post psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 नोकरी संभाळत शिक्षकाने सुरु केली प्रायोगिक शेती… वर्षभरात करतो करोडोंची उलाढाल
2 समजून घ्या: का होतोय #BoycottErosNow ट्रेंड? नवरात्रीशी काय आहे संबंध?
3 “फडणवीस यांनी एकनाथ खडसेंचा राजकीय बळी घेतला असून…”; राणेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
Just Now!
X