गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं हॅलो आणि टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारनं ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वांमध्ये क्रेझ असलेल्या PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds ) या गेमचाही समावेश आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या PUBG गेमवर बंदी घातल्यामुळे विविध चर्चा आणि अफवांना उधान आलं आहे. अपेक्षेप्रमाणेच सोशल मीडियावर मिम्स आणि विनोदाचा पाऊस पडला. अशामध्येच काही चुकीच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हायरल झालेल्या ट्विटनुसार PUBG गेमला रिप्लेस करण्यासाठी JioG गेम येत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की,  रिलायन्सकडून अद्याप या प्रकराची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आलेली नाही. ही एक अफवा असून यावर विश्वास ठेवू नयेत.

व्हायरल होत असलेल्या एका ट्निटनसार. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी JioG गेमची घोषणा केली आहे. हा गेम PUBG सारखा असून तो PUBG ची जागा घेईल असा दावा केला जात आहे. तसेच एएनआय़ या वृत्तसंस्थेच्या नावानेही जीओजी गेम येणार असल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहे. मात्र हा स्क्रीनशॉर्ट खोटा आहे. रिलायन्सकडून अधिकृतरित्या अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच प्लेस्टोरमध्येही अशा नावाची कोणतेही गेमिंग अॅप उपलब्ध नाही.

JioG वरुन एएनआयच्या नावाने ट्विट असल्यामुळे अनेकांजणांनी याला खरं समजलं जात आहे. हे ट्विट सध्या चर्चेचा विषय असून या ट्विटचा दाखला देत जिओजी गेम येणार असून ती PUBG ला रिप्लेस करेल असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी यावर विविध प्रकारचे जोक्स आणि मीम्सही शेअर केल्या आहेत.

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने याआधीही काही चिनी अॅपवर बंदी घातली होती. आतापर्यंत भारत सरकारने २२४ चिनी अॅपवर बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉक आणि PUBG सह अन्य लोकप्रिय अॅपचा समावेश आहे. भारत सरकारनं पहिल्यांदा ५९ चिनी अॅप बॅन केले होते. त्यानंतर ४७ आणि आता ११८ चिनी अॅप बॅन केले आहेत.