इस्रायलमधील काही तरुणांना एक हजार वर्ष जुन्या मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेली सोन्याची नाणी सापडली आहेत. इस्रायल हा खजिना १८ ऑगस्ट रोजी सापडला. देशातील एंटीक्विटीज अथॉरिटीने सोमवारी यासंदर्भात अधिकृतरित्या माहिती दिली. मध्य इस्रायलमध्ये एका उत्खननादरम्यान तरुणांना हा खजिना सापडला. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार उत्खननासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या लियात नवाद जिव यांनी, “ज्या व्यक्तीने ११०० वर्षांपूर्वी हा खजिना जमीनीमध्ये पुरला असेल त्याने नक्कीच हा परत मिळवण्याचा प्रयत्न केला असणार,” असं मत नोंदवलं आहे.

ही मातीची भांडी अशाप्रकारे बांधून ठेवण्यात आली होती की ती अजिबात हलता कामा नये. या भांड्याच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी वेगवेगळ्या वस्तू पसरवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र हा खजिना पुन्हा बाहेर काढण्यापासून मूळ मालकाला कोणी अडवलं याचा फक्त आपण अंदाज व्यक्त करु शकतो असं लियात म्हणाले. जेव्हापासून हा खजिना येथे लपवण्यात आला तेव्हापासून या खजिन्याच्या मालकाची ओळख समोर आलेली नाही. हा अनुभव खूपच रोमांचक आहे. “मी जेव्हा सहकाऱ्यांबरोबर उत्खनन सुरु केलं तेव्हा जमीनीच्या खाली मातीमध्ये एका नाजूक पानासारखी काहीतरी गोष्ट दिली. जेव्हा मी माती बाजूला सारून नीट पाहिलं तर ती सोन्याची नाणी असल्याचे दिसून आलं. अशा प्रकारचा खजिना सापडले खरोखरच थक्क करणारं आहे,” असं मत या मोहिमेतील एका तरुण स्वयंसेवकाने नोंदवलं आहे.

नाण्यांचे अभ्यास करणाऱ्या रॉबर्ट कूल यांनी ही नाणी नवव्या शतकातील अब्बासिद खालीफच्या काळातील असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या काळामध्ये ४२५ शुद्ध २४ कॅरेटची नाण्यांना विशेष महत्व असायचे. हे धन एवढ्या प्रमाणात होते ते त्या काळात कोणालाही या पैशांमधून एखादे छानसे घर घेणं शक्य होत. इजिप्तमधील संस्कृतीही प्रगत होती हे आपण विसरता कामा नये असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.