24 September 2020

News Flash

आठ वर्षांपूर्वी सिगारेट सोडली; वाचवलेल्या पैशांमधून साकार केलं मोठ्या घराचं स्वप्न

वयाच्या १३ व्या वर्षापासून करायचे धुम्रपान, ६७ व्या वर्षी सोडले व्यसन आणि...

(उजवीकडील फोटो न्यूज१८ च्या सैजन्याने)

सिगारेटचे व्यसन आरोग्यासाठी हानीकारक असते आणि सिगारेट सोडल्याने आरोग्याला भरपूर फायदा होतो असं सिगारेटविरोधी जनजागृतीच्या जाहिरातींमध्ये सांगितले जाते. मात्र केरळमधील एका व्यक्तीला सिगारेट सोडल्याने झालेल्या आर्थिक फायद्यामधून चक्क मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करता आलं आहे.

कोझीकोडे येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय वेणूगोपालन नायर यांनी आठ वर्षांपूर्वी सिगारेट सोडली. मात्र त्याआधी त्यांचा सिगारेटवर खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च व्हायचा. मात्र एका आरोग्य तपासणीनीनंतर त्यांनी सिगारेट सोडली. या निर्णयाचा त्यांच्या आरोग्याला तर फायदा झालाच शिवाय यातून त्यांना मोठा आर्थिक फायदाही झाला.

सिगारेट सोडल्यापासून १०० महिन्यांमध्ये (८ वर्ष ४ महिने) वेणूगोपालन यांनी पाच लाख रुपयांची बचत केली आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी सिगारेट सोडली नसती तर हे पैसेही सिगारेटवरच खर्च झाले असते. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेणूगोपालन यांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने बचत करण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि दोन मुलांचा विचार करुन त्यांनी सिगारेटसाठी खर्च होणारे पैसे बाजूला काढण्यास सुरुवात केली. तरुण वयामध्ये सिगारेटचे व्यसन लागल्याने त्यांच्या आरोग्यावर या व्यसनाचे गंभीर परिणाम दिसू लागल्याचे त्यांना ६५ व्या वर्षानंतर जाणवू लागले. “मी वयाच्या १३ व्या वर्षांपासूनच लपूनछपून धुम्रपान करुन लागलो. आधी मी बिडी ओढायचो. चार आण्याला मला तीन बिड्या मिळायच्या. ६७ व्या वर्षापर्यंत धुम्रपान करत राहिल्याचे त्याचे गंभीर परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. मला छातीत दुखू लागल्यानंतर मी काही चाचण्या केल्या आणि त्यामुळेच आज मी जिवंत आहे,” असं वेणूगोपालन यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितले.

छातीसंबंधित आजारामुळे त्यांनी सिगारेट सोडून दिली. ५० रुपयांना एक पाकीट याप्रमाणे व्यसनी व्यक्ती दिवसाला २० सिगारेट म्हटलं तरी १०० रुपये धुम्रपानाच्या व्यसनावरच खर्च करतो, असं गाणित मांडता येईल. सिगारेट सोडल्यामुळे वेणूगोपालन यांचा खर्च कमी झाला आणि ते सिगारेटवर रोज खर्च होणारे पैसे बाजूला काढून ठेऊ लागले. आता याच पैशांमधून त्यांना स्वत:च्या घरावर आणखीन एक मजला बांधायचा आहे. त्यामुळे त्यांनी बचत म्हणून बाजूला काढलेले पाच लाख वापरुन त्यांनी घराच्या वरच्या मजल्याचे काम सुरु केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:30 am

Web Title: kerala man gets bigger home with rs 5 lakh he saved after he quit smoking 8 years ago scsg 91
Next Stories
1 संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये आहे राम, सीता आणि लक्ष्मणाचे चित्र; देशाच्या कायदा मंत्र्यांनीच दिली रंजक माहिती
2 राम मंदिर भूमिपूजन सोहळा : याची देही याची डोळा… जाणून घ्या ४० वर्ष हिंदूंची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय व्यक्तीबद्दल
3 #JaiShreeRam आणि #BabriZindaHai सोशल नेटवर्किंगवर टॉप ट्रेण्डमध्ये
Just Now!
X