अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरु असलेला थरार अखेरीस संपला आहे. अटीतटीच्या लढतीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन जो बायडन यांनी बाजी मारली आहे. परंतू गेले दोन दिवस मतांच्या मोजणीवरुन ट्रम्प आणि बायडन यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगताना दिसलं. मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत ट्रम्प यांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला, परंतू इकडेही त्यांच्या पदरी निराशाच आली.

आपल्या हातून सत्ता निसटत आहे याचा संकेत मिळत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन I Won this Election by a Lot असं म्हणत मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटवर मुंबईकर क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक वासिम जाफर यांने भन्नाट उत्तर देत ट्रोल केलं आहे. पाहा काय म्हणतोय जाफर…

आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या सामन्यांमध्ये चांगली झुंज देत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतू मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीमुळे पंजाबला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न गमवावं लागलं.