८५ वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या तस्मानियन वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नॅशनल फिल्म अँड साउंड आर्काइव्ह ऑफ ऑस्ट्रेलियाने आपल्या आधिकृत ट्विटर खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तस्मानियन वाघ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. शरिरावरील विशिष्ट पट्ट्यासाठी तस्मानियन वाघाला ओळखले जाते. सध्या प्रजाती जगाच्या पाटीवरून नामशेष झाली आहे.

नॅशनल फिल्म अँड साउंड आर्काइव्ह ऑफ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार तस्मानियन वाघाचा हा व्हिडिओ १९३५ मध्ये चित्रित करण्यात आला होता. तस्मानियन वाघाचे आधीचे नाव बेंजामिन असे नाव होते. एका प्रसिद्धी पत्रकानुसार हा वाघ हॉबर्टच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. त्याच वेळी, दुसरा वाघ लंडन प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. या दोन ठिकाणी या प्रजातीचे वाघ ठेवण्यात आले होते.

बेंजामिन हा वाघ ८५ वर्षांपूर्वी भेटला होता. बेंजामिन यांचा मृत्यू होण्यापूर्वी काही वेळापूर्वी हा व्हिडिओ चित्रित केला होता. २१ सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगातील हा एकमेव तस्मानियन वाघ असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.