News Flash

VIRAL VIDEO : पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे माकड झाले ‘लठ्ठ’

त्याचे हिंडणे फिरणेही आता अवघड झाले

हिल स्टेशन किंवा हल्ली कोणत्याही पर्यटन स्थळांवर आपण गेलो की एक प्राणी आपल्याला हमखास आढळतो तो म्हणजे माकड. माणसांना न घाबरता ते अगदी त्याच्या जवळ येतात. अनेकदा तर माणसांच्या हातातल्या वस्तू चोरूनही ते पोबारा करतात. तर कधी कधी माणसं काहीतरी खायला घालतील या आशेने त्यांच्याभोवती घुटमळत बसतात. या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आढळणारी माकडं पर्यटकांनी फेकलेले किंवा खायला दिलेल्या वेफर्स, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे, केळी यासारख्या पदार्थांवर आपले पोट भरतात. माणसंही अगदी निश्चित होऊन त्यांना जंक फूड खाऊ घालतात, पण आपल्या या वागण्याचा या प्राण्यांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतोय, याची कल्पना केलीय का आपण? जर तुम्हीही असे बेजबाबदार वागत असाल तर व्हायरल होत असलेला हा फोटो आणि व्हिडिओ नक्की पाहा. पर्यटकांनी फेकलेले जंक फूड खाऊन खाऊन या माकडाचे पोट एवढे सुटले आहे की त्याचे हिंडणे फिरणेही आता अवघड झाले आहे.

बँकॉक इथल्या फ्लोटिंग मार्केटमधल्या एका माकडाचा हा फोटो आहे. ‘अंकल फॅटी’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. येथे येणारा पर्यटक उरले सुरलेले पदार्थ त्याला खायला देतो. हे प्रमाण एवढं वाढलंय की या माकडाचे वजन त्याच्या मूळच्या वजनापेक्षाही दुप्पट वाढलंय. वजनामुळे त्याला नीट हिंडता फिरताही येत नाही. पण लोकांना आणि इथल्या पर्यटकांना मात्र हे लठ्ठ माकड पाहून फारच गंम्मत वाटते. त्याच्यासारखी पोट सुटलेली आणि जागेवरूनही हलू न शकणारी शेकडो माकडे या परिसरात आहेत. जंक फूड खायला दिल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय हे सुशिक्षित पर्यटकांना माहिती असूनही ते बेजबाबदारपणे वागत आहेत. शेवटी इथल्या प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतला आहे आणि लवकरच या लठ्ठ माकडांना ‘फॅट कँम्प’मध्ये पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. येथे उपचार करून त्यांचे वजन कमी करण्यात येईल. जनजागृतीसाठी याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओद्वारे या मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ करू नये, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2017 6:33 pm

Web Title: obese monkey n thailand will sent to the fat camp
Next Stories
1 Viral Video : बीकॉमपर्यंत शिक्षण आणि व्यवसाय ‘कचरा वेचक’
2 मेसेजच्या कटकटीने वैतागलेल्यांसाठी व्हॉट्सअॅपने आणलंय ‘हे’ नवं फिचर
3 नेपाळमधल्या गर्भश्रीमंत व्यावसायिकाचा भारतात राजेशाही पद्धतीने विवाहसोहळा
Just Now!
X