सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल दिसतोच, आणि या मोबाइलवर आवश्यक प्रत्येक गोष्ट उपलब्ध असते. यात हैराण करणारी बाब म्हणजे भारतात ज्या वेगाने स्मार्टफोनची विक्री सुरू आहे त्याच वेगाने स्मार्टफोनवर पॉर्न (ब्लू फिल्म) पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय. २०१९ या वर्षात मोबाइलवर पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारत देश अव्वल ठरलाय.

अडल्ट इंटरनेटमेंट साईट पॉर्न हबच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक पॉर्न पाहण्यात आले, भारतानंतर याबाबतीत अमेरिकेचा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये ८९ टक्के भारतीयांनी मोबाइलवर पॉर्न पाहिले आहे. २०१७ मध्ये ही आकडेवारी ८६ टक्के होती, म्हणजेच ही आकडेवारी २०१७ च्या तुलनेत ३ टक्के जास्त आहे. भारतानंतर मोबाइलवर पॉर्न पाहण्यात दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्याखालोखाल अनुक्रमे ब्राझिल, जपान आणि युकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेत ८१ टक्के, ब्राझिलमध्ये ७९ टक्के, जपानमध्ये ७० टक्के तर युकेमध्ये ७४ टक्के लोकांनी मोबाइलवर पॉर्न पाहिले. याशिवाय जगभरात चार लोकांपैकी तीनजण मोबाइलवर पॉर्न पाहतात असंही पॉर्न हबच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. पॉर्नहबच्या इयर इन रिव्ह्यू रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे.

Gangster Goldy Brar Death News
सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?
khalistani sikh
खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचल्याचा आरोप, कोण आहेत विक्रम यादव?
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?

आणखी वाचा : (Porn वेबसाइट्स ‘बॅन’, पण पाहणाऱ्यांनी शोधला ‘जुगाड’)
भारतात पॉर्न पाहण्यात वाढ होण्यासाठी कारण ठरतंय ते म्हणजे स्वस्त इंटरनेट. स्वस्त डेटा प्लान आणि महागड्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी झाल्याने देशात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्वस्त मोबाइल इंटरनेट उपलब्ध असल्याने लोकांना मोबाइलवर इंटरनेट सर्फिंग करणे खूपच सोपे झाले आहे. भारतात एका स्मार्टफोनवर ९.८ जीबी प्रति महिना खर्च होतोय, २०२४ पर्यंत हे दुप्पट होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.