परग्रहांवर जीवसृष्टी आहे का या प्रश्नांचं उत्तर अजूनही आपल्याला थेटपणे सापडलेलं नाही आहे. या विश्वाचा पसारा अनंत आणि अखंड असल्यामुळे अंतराळात ‘कुठेतरी’ जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवली जाते. पण ती नक्की कुठे आहे आणि त्या जीवसृष्टीचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला कधी होणार, याविषयी कोणालाच माहिती नाही. मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे सापडले. गुरू ग्रहाच्या ‘य़ुरोपा’ या बर्फाळ ग्रहाच्या पृष्ठभागाखाली मोठमोठे महासागर असल्याचे अंदाज व्यक्त केले जातात. पण त्याबाबत पुष्टी देता येत नाही. पण आता पहिल्यांदाचा जीवसृष्टीचा थेट पुरावा सापडल्याचं ‘नासा’ कडून सांगण्यात आलंय. ‘नासा’चं हे ट्वीट पाहा.

 

आपल्या या ट्वीटमध्ये नासाने शनिग्रहाच्या ‘एनसेलॅडस’ या उपग्रहावर जीवसृष्टीचा पुरावा सापडल्याचं म्हटलं आहे. हा उपग्रह बर्फाळ आहे. पण बर्फाच्या थराखाली असलेल्या पाण्याच्या महासागरांमध्ये अनेक ‘हायड्रोथर्मल वेंट्स’ असल्याचं नासा ने म्हटलं आहे. ‘हायड्रोथर्मल वेंट्स’ म्हणजे समुद्राखाली असलेले एका प्रकारचे ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींमधून निघणाऱ्या हायड्रोजनमुळे आणि उष्णतेने जीवसृष्टीला पोषक वातावरण तयार होतं असं ‘नासा’चं म्हणणं आहे.
ही बातमी इंटरनेटवर जाहीर झाल्यावर त्यावर जोक्स मारणं सुरूच झालं.

 

१. “माझ्या आयुष्यात एक तरी ‘एलियन’ मला दिसू दे”

 

२. या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? बरंय, पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा मला कंटाळा आलेलाच आहे””