अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली. यामधूनच अखेर रविवारपासून अमेरिकेत वर्षातील तिसरे शटडाऊन सुरु झाले. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस सस्थगित झाल्याने ऐन नाताळात “शटडाऊन’ सुरू आहे.

मात्र या सर्व घाडमोडींच्या आदी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटवरून एक ट्विट करुन डेमोक्रॅटिक पक्षावर टिका केली. डेमोक्रॅटिक पक्षामुळे मेक्सिकोच्या सिमेवर भिंत उभारण्यास अडचण येत असल्याचे ट्रम्प म्हणाले. तसेच या गोंधळामुळे आपण १६ दिवसांचा सुट्टीचा दौरा रद्द केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. या ट्विटबरोबर त्यांनी आपला एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ट्रम्प काही बिल्स (कायद्यांसंदर्भातील सरकारी आदेश) स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. टेबलवरील अनेक कागदांपैकी एक कागद समोर ठेऊन ट्रम्प त्यावर सही करताना समोर पाहत असल्याचा हा फोटो आहे.

मात्र हा फोटो ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर टिका केली आहे. अनेकांनी या ट्विटमधील फोटोतील ट्रम्प सही करत असणारे कागद कोरेच असल्याचे लक्षात आणून दिले आहे. तर अनेकांनी ज्या दिवशी ट्विट करण्यात आले त्या दिवशी ट्रम्प यांनी इतके कायदे किंवा आदेश जारीच केले नाहीत असेही सांगितले आहे. जीओव्हीट्रॅक टॉट यूएस या वेबसाईटच्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी २१ डिसेंबरनंतर एकाही बिलवर स्वाक्षरी केलेली नाही. पाहूयात काय म्हणाले आहेत नेटकरी…

कोरा कागद

बिल तुम्ही लिहीणार आहात का

काय बोलणार

पेनचं झाकणं तरी काढा

कठीण आहे सगळचं

कोऱ्या कागदाची कल्पना तुम्हाला आहे ना

हे चुकीचं आहे

राजीनाम्यावर सही करा…

काम करण्याचा अभिनय

इतकी टिका होत असतानाच ट्रम्प यांनी यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये मॅक्सिकोच्या सिमेवर भिंत उभी राहिलीच पाहिजे अशी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.