22 April 2019

News Flash

मोदींबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन स्मृती इराणी झाल्या ट्रोल, पाहा व्हायरल ट्विट

स्मृती इराणींचे ते वक्तव्य म्हणजे भारतीयांसाठी सुवर्ण संधी

स्मृती इराणी झाल्या ट्रोल

गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले. प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केली. याच वक्तव्यावरून आता स्मृती इराणी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसत आहेत.

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्मृती यांच्या १७ वर्षापूर्वीचे एक वक्तव्य ट्विट करत त्यांच्यावर टिका केली आहे. प्रियंका ट्विटवर म्हणतात, ‘ थोडं भूतकाळात जाऊयात, २००२ साली याच स्मृती इराणींनी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.’

चुतर्वेदींबरोबरच नेटकऱ्यांनीही स्मृती यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

शिक्षण पण म्हणूनच सोडले…

असा अर्थ घेतला

तेव्हा आणि आता

चार वर्षांमधील फरक

एकावर एक फ्री

त्या प्रतिक्रियेवर मोदींची प्रतिक्रिया

बघा नंतर काय झाले

पुन्हा एक ड्रामा

भारतीयांना सुवर्ण संधी

यावर मोदी म्हणाले

दरम्यान याचवेळी बोलताना, अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असं सूचक विधानही इराणी यांनी केले. चार पिढय़ा मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे ज्यांनी बघितले नाही ते देशातील शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी सवाल केला. प्रियांका गांधी यांचा त्यांनी संपूर्ण मुलाखतीमध्ये सातत्याने ‘व्रढा’ असा उल्लेख केला हे विशेष.

First Published on February 6, 2019 4:34 pm

Web Title: smriti irani says she will quit politics if modi retires netizens troll her