News Flash

सँडविच चोरल्यामुळे ९ कोटी पगार घेणाऱ्या भारतीय बँकरचं निलंबन

कँटीनमधून सँडविच चोरी केल्याची घटना

(छाया सौजन्य - फेसबुक)

कँटीनमधून सँडविच चोरी केल्याच्या आरोपाखाली लंडनच्या सिटी बँकेतील भारतीय बँकर पारस शाह याचं निलंबन करण्यात आलं आहे. सँडविच चोरीच्या आरोपांनंतर बँकेने केलेल्या कठोर कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

31 वर्षीय पारस शाह यांचे वार्षिक वेतन जवळपास नऊ कोटी २० लाख रुपये होते, अशी माहिती आहे. सँडविच चोरीची घटना कधी घडली किंवा आतापर्यंत कितीवेळेस ही घटना घडली याबाबत माहिती मिळालेली नाही. लंडनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पारस शाह हे सिटी बँकेच्या लंडनमधील केनेरी व्हार्फ येथील मुख्यालयात कार्यरत होते. येथील कँटीन एखाद्या मोठ्या रेस्टॉरंट प्रमाणे आहे. युरोपातील सर्वात महागड्या क्रेडिट ट्रेडर्समध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता.

पारस शाह युरोप, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेसाठी ब्रँडची ट्रेडिंग करणाऱ्या विभागाचे प्रमुख होते. बोनससोबत त्यांचे वेतन एक मिलियन पाउंड म्हणजे जवळपास ९ कोटी २० लाख रुपयांपेक्षा अधिक होते असं समजतंय. पुढील महिन्यात बोनसची घोषणा होणार होती, पण त्यापूर्वीच त्यांचं निलंबन झालं.

पारस शाह हे २०१७ मध्ये सिटी बँकेत कार्यरत झाले, त्यापूर्वी जवळपास सात वर्ष ते एचएसबीसी बँकेत होते. पारस शाह यांनी बाथ युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात ऑनर्सची डिग्री घेतल्यानंतर एचएसबीसी बँकेतून नोकरीला सुरूवात केली. बँकेच्या सर्वात मोठ्या क्रेडिट ट्रेडर्समध्ये त्यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 12:57 pm

Web Title: stealing sandwiches from the staff canteen citigroup suspends senior bond trader paras shah sas 89
Next Stories
1 पेटीएम वापरायचं असेल तर तुम्हाला ‘हे’ अ‍ॅप्स करावे लागतील डिलीट
2 मुलीने मुस्लीम मुलाला लग्नासाठी दिला होकार; बिल गेट्स यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 Coronavirus च्या विळख्यातही त्या दोघांचं ‘कहो ना प्यार है!’
Just Now!
X