करोना व्हायरसच्या चपाट्यात जगभरातील १८ लाखांपेक्षा जास्त लोक आले आहेत. या महामारीने आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. करोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी जगभारतील सर्वच डॉक्टर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. रूग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी डॉक्टर विविध प्रयोग करत आहेत. असाच रूग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा पाकिस्तानच्या डॉक्टरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

गौतम गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओत पाकिस्तानमधील डॉक्टर करोना रूग्णांवर उपचार करताना डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत गंभीरने म्हटलेय की, ‘करोना तुम जहां भी हो सुन लो चिट्टा चोला’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाकिस्तानी डॉक्टर डान्स आणि हासून रूग्णांमध्ये सकारात्मक विचार वाढवत आहेत. डॉक्टरांच्या या कृतीला गंभीरने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

पाकिस्तानमध्ये करोना व्हायरस संक्रमण झालेल्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. सध्या पाकिस्तानमध्ये ५००० पेक्षा जास्त करोना बाधित रूग्ण आहेत. तर ८५ पेक्षा जास्त जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसच्या विरोधाच्या लढाईत गौतम गंभीर यांनी भारताला शक्य तितकी मदत केली आहे. दिल्ली सरकार आणि पीएम फंडात कोट्यवधी रूपयांची आर्थिक मदत केली आहे. गौतम गंभीर आपल्या पाकिस्तान विरोधातील वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.