रविवारी इंग्लंड संघाने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. जेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं. विश्वचषक हातात घेतल्यानंतर मैदानात इंग्लंडच्या खेळाडूंनी शॅम्पेन उडवत आपला विजयोत्सव साजरा केला.

जेतेपदानंतर संपूर्ण संघ शॅम्पेनची बाटली उघडत सेलिब्रेशन करत होता. पण सेलिब्रेशन अर्ध्यावरच सोडत इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशिद या दोन खेळाडू संघापासून वेगळे झाले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुस्मीम धर्मात दारु वर्ज्य मानली जात असल्यामुळे मोईन अली आणि रशिद इंग्लंडच्या संघापासून दूर गेले होते. याआधी ज्यावेळीही संघ शाम्पेन उडवत सेलिब्रशन करतो त्यावेळी हे दोघे संघापासून दूर थांबतात.

सोशल मीडियावर या दोन्ही खेळाडूंवर काही जणांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी कुचक्या भाषेत टीकाही केली आहे. इमाम तवाहिदी म्हणतात. ब्रिटिश मुस्लिम क्रिकेटपटू शॅम्पेन पाहून पळून गेले. हा प्रकार हास्यास्पद आहे. हे सर्व पाहून मला माझं हसू अनावर झालं आहे, असे म्हटले आहे