जगात डॉक्टरांना देव मानलं जातं आणि याच देवाच्या अथक प्रयत्नांमुळे कोमात गेलेल्या गर्भवती महिलेचं बाळ सुखरूप या जगात जन्माला आलंय. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी प्रगती साधवाणी या महिलेला भरती करण्यात आलं होतं. गेल्या आठ वर्षांपासून ती मधुमेहाच्या आजारानं त्रस्त आहे. ५ मार्चाला शुगर लेव्हल कमी झाल्यानं ती बेशुद्ध पडली. ती कोमामध्ये गेली असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. प्रगती त्याचवेळी काही महिन्यांची गर्भवतीदेखील होती.

वाचा : सेल्फीच्या कॉपीराईट्सची माकडाची लढाई संपली; फोटोग्राफरकडून मिळणार २५% रक्कम

तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला वाचवणं हे डॉक्टरांसमोरचं मोठ आव्हान होतं. पण डॉ आर. एस. वाडिया आणि डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे तिचं बाळ या जगात सुखरूप जन्माला आलं. प्रगती जळपास ८५ दिवस कोमामध्ये होती. ती कोमामध्ये असताना दोन्ही डॉक्टरांनी तिच्या पोटातील गर्भाची वाढ नीट होईल याची पुरेपुर काळजी घेतली. कोमातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच प्रगतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई कोमात असताना सुदृढ बाळ जन्माला आल्याने डॉक्टरांसह सर्वांनीच आनंद व्यक्त केला.

Viral Video : ट्रेनमध्ये बसायला जागा देत नाही म्हणून पाहा आजीबाईंनी काय केलं