News Flash

भारतातील ‘या’ बाजारपेठेत दिसते ‘महिला राज’

बाजारपेठेतल्या २ हजार दुकानांत महिला विक्रेत्या

भारतातले ही एकमेव बाजारपेठ असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणत महिला विक्रेत्या पाहायला मिळतील.

त्या त्या देशातील किंवा राज्यातील बाजारपेठा या नेहमीच वैशिष्यपूर्ण असतात. या बाजारात त्या प्रदेशाची संस्कृती, तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू आणि अनेक गोष्टी पाहायला मिळतात. अनेक वाहिन्यांवर तर जगभरातील बाजारपेठांवर कार्यक्रम किंवा माहितीपटही काढण्यात आले आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण बाजारात समावेश आहे ते मणिपूरच्या ‘इमा मार्केट’चा. हे मार्केट वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे कारण या बाजारपेठेतील जवळपास २ हजार दुकाने महिला चालवतात.

भारतातली ही एकमेव बाजारपेठ असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणत महिला विक्रेत्या पाहायला मिळतील. ही बाजारपेठ इमा मार्केट म्हणून ओळखली जाते. याला ‘मदर्स मार्केट’ म्हणूनही ओळखले जाते. मणिपूरी भाषेत इमाचा अर्थ होतो आई. फळे, भाज्या, मासे, शस्त्रे टोपल्या अशा अनेक वस्तू या बाजारात उपलब्ध आहेत. कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांकडून चालवण्यात आलेली ही एकमेव बाजारपेठ असेल. मणिपूरच्या इम्फाळमध्ये ही बाजारपेठ आहे. अनेक गरजेच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत. मणिपूरचे स्थानिक उत्पादने येथे पाहायला मिळतात. ही बाजारपेठ पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक कधीच रिकाम्या हाताने परतत नाही असे म्हणतात. इतिहासकारांच्या मते फार पूर्वीपासूनच ही बाजारपेठ महिलांकडून चालवण्यात आली आहे. घरातील पुरुष लढाईसाठी शेजारच्या राज्यात किंवा देशात जात. त्यामुळे घर चालवण्यासाठी महिलांकडे कोणताच पर्याय नसयचा. म्हणून या महिलांनी वस्तू विकायला सुरुवात केली. या बाजारपेठेत तर काही महिला या पंन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून वस्तू विकत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 8:47 pm

Web Title: words only market which is run by women
Next Stories
1 ‘शंघाय टॉवर’मध्ये आहे जगातील सर्वात वेगवान उद्वाहन
2 स्वीडनमध्ये बनवले बर्फापासून हॉटेल
3 राजकुमाराच्या नजरेतून दुबई दर्शन
Just Now!
X